Coconut Farming : ‘ही’ आहे प्रमुख चार नारळ उत्पादक राज्य; पहा, महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशभरात नारळाचे उत्पादन (Coconut Farming) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नारळ हे भारतीय संस्कृतीचे एक विभिन्न अंग आहे. म्हणजे घराघरात नारळाचा मुख्यत्वेकरून धार्मिक कार्यांमध्ये वापर केला जातो. मसाल्याचा पदार्थ म्हणून सुक्या खोबऱ्याला मोठी मागणी असते. याशिवाय नारळाचे तेल देखील अनेक गोष्टींसाठी वापरले जाते. इतकेच नाही तर विविध पद्धतीने उपयोगी असल्याने नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ देखील म्हटले जाते. मात्र, तुम्ही कधी विचार केलाय का? की देशात सर्वाधिक नारळ उत्पादन कोणत्या राज्यात होते? नारळ उत्पादक पहिली चार राज्य कोणती? महाराष्ट्राचा नारळ उत्पादनात (Coconut Farming) कितवा क्रमांक लागतो? आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कर्नाटक प्रथम स्थानी (Coconut Farming Top Four States)

नारळ हे एक नगदी पीक असून, ते बहुवार्षिक आहे. एकदा लागवड केल्यानंतर नारळाच्या झाडापासून (Coconut Farming) मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवला जाऊ शकतो. कारण नारळाचे दररोजच्या जीवनात अनगिणत फायदे आहेत. देशातील नारळ शेतीचा विचार करता, सर्वाधिक नारळ उत्पादन हे कर्नाटक या राज्यात होते. येथील शेतकरी देशातील एकूण नारळ उत्पादनापैकी 30.83 टक्के नारळ उत्पादन घेतात. अर्थात जवळपास एक तृतीयांश नारळ उत्पादन हे एकट्या कर्नाटकात होते.

महाराष्ट्र 9 व्या स्थानी

कर्नाटकनंतर तामिळनाडू हे राज्य नारळ उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या ठिकाणी देशातिल एकूण नारळ उत्पादनापैकी 27.47 टक्के उत्पादन होते. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर केरळ हे राज्य असून, त्या ठिकाणी देशातील एकूण नारळ उत्पादनापैकी 24.22 टक्के उत्पादन होते. तर चौथ्या क्रमांकावर आंध्रप्रदेश हे राज्य असून, त्या ठिकाणी 8.22 टक्के नारळ उत्पादन होते. देशातील एकूण नारळ उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक 9 वा आहे.

देशातील नारळ लागवडीखालील (Coconut Farming) क्षेत्रात महाराष्ट्र 7 व्या स्थानावर आणि उत्पादनात 9 व्या स्थानावर आहे. 1986-87 ते 2018-19 या 33 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील नारळाचे क्षेत्र 6900 हेक्टर वरून, 43320 हेक्टरपर्यंत आणि उत्पादन 76.32 दशलक्ष नारळहुन 209.87 दशलक्ष नारळ इतके वाढले आहे. नारळाच्या लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. त्याखालोखाल रत्नागिरी जिल्ह्यात नारळाच्या बागा आहेत. महाराष्ट्रात या पिकाच्या लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे आणि अपारंपरिक क्षेत्रात नारळाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

error: Content is protected !!