हॅलो कृषी ऑनलाईन : कोकणासह देशातील नारळ (Coconut MSP) उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (एमएसपी) मध्ये अडीचशे ते तीनशे रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता खोबऱ्याला 11 हजार 160 रुपये प्रति क्विंटल ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारावरील कॅबिनेट समितीच्या (CCEA) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नारळ उत्पादक (Coconut MSP) शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या वर्षी देखील डिसेंबर महिन्यात सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (एमएसपी) (Coconut MSP) मध्ये वाढ करण्यात आली होती. योग्य आणि सरासरी गुणवत्तेच्या गोटा खोबऱ्याच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोटा खोबऱ्याला (सुके खोबरे) 12 हजार रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळणार आहे. तसेच मिलिंग खोबऱ्याची (तेल काढण्यासाठी वापरले जाणारे) किमान आधारभूत किमतींमध्ये 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मिलिंग खोबऱ्याला 11,160 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव मिळणार आहे. केंद्र सरकारने नववर्ष सुरुवातीला दोनच दिवस बाकी असताना हमीभावात केलेल्या या वाढीमुळे नारळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा (Coconut MSP Increase By Government)
केरळ आणि तामिळनाडू हे खोबऱ्याचे प्रमुख उत्पादक आहेत. तर गोटा खोबऱ्याचे उत्पादन प्रामुख्याने कर्नाटकात होते. महाराष्ट्रात नारळ लागवडीचे एकूण क्षेत्र 43,160 हेक्टर इतके आहे. त्यातून 22.36 लाख इतके उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे आता या दोन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, चालू हंगामात केंद्र सरकारने 1493 कोटी रुपयांच्या 1.33 लाख टनांहून अधिक खोबऱ्याची विक्रमी खरेदी केली आहे. ज्याचा सुमारे 90 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 2022 च्या तुलनेत चालू सत्रात खरेदी 227 टक्के जास्त खरेदी झाली आहे.