Coloured Cauliflower: आरोग्यपूर्ण आणि जास्त नफा देणारी रंगीत फुलकोबी! तुम्ही कधी बघितली आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या फुलकोबीची (Coloured Cauliflower) लागवड केलेली असेल परंतु कधी वेगवेगळ्या रंगाच्या फुलकोबीची लागवड केलेली आहे का? तुमच्यापैकी बहुतेक जणांनी रंगीत फुलकोबी बघितली सुद्धा नसेल. जाणून घेऊ या रंगीत फुलकोबीमध्ये (Coloured Cauliflower) काय विशेषता असते.

बिहार (Bihar) राज्यातील कृषी विज्ञान केंद्र (KVK Bihar) समस्तीपुर येथील भाजीपाला पीक (Vegetable Expert) तज्ज्ञ डॉ. अभिषेक प्रताप सिंग यांनी रंगीत फुलकोबीच्या लागवडीचे तंत्र विकसित केले आहे. या रंगीत फुलकोबीबद्दल ते सांगतात की रंगीत फुलकोबीची लागवड साध्या फुलकोबीसारखीच (Cauliflower Cultivation) आहे. परंतु या फुलकोबीला मिळणारा दर मात्र खूप जास्त आहे त्यामुळे शेतकरी या फुलकोबीची (Coloured Cauliflower) लागवड करून त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात.

आरोग्यदायी रंगीत फुलकोबीची वैशिष्ट्ये (Benefits Of Coloured Cauliflower)

भाजीपाला पीक तज्ज्ञ डॉ. अभिषेक प्रताप सिंग यांनी सांगितले की, रंगीबेरंगी फुलकोबी चवीलाच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. या फुलकोबीमध्ये कॅरोटीनोइड्स, फ्लेव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक ॲसिड, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन पी आणि आवश्यक खनिजे आढळतात. हे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल (Control Cholesterol) आणि रक्तदाबाची पातळी नियंत्रित ठेवता येते. रोजच्या आहारात अशा रंगीत फुलकोबीचा समावेश केल्याने आरोग्य तर सुधारतेच शिवाय त्वचाही चमकदार होते, असे ते म्हणाले. ज्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती (Resistant Power) कमकुवत आहे अशा व्यक्तीसाठी अशा फुलकोबीचे सेवन करणे फायदेशीर आहे.

रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड का फायदेशीर आहे? (Coloured Cauliflower)

भाजीपाला पीक तज्ज्ञ अभिषेक यांनी सांगितले की, रंगीबेरंगी फुलकोबीचे (Cauliflower) पीक लागवडीनंतर 100 ते 110 दिवसांनी काढणीसाठी तयार होते, यापासून सरासरी एकरी 100 ते 125 क्विंटल फुलकोबीचे उत्पादन (Cauliflower Production) मिळते. रंगीबेरंगी फुलकोबीच्या लागवडीतील उत्पन्न आणि खर्चाबाबत बोलताना ते म्हणाले की, एका एकरात फुलकोबीची लागवड केल्यास सुमारे 50 हजार रुपये खर्च येतो. बाजारात ही फुलकोबी 25 रुपये किलोने सहज विकली जाते. अशा प्रकारे 100 क्विंटलपासून एकूण उत्पन्न सुमारे अडीच लाख रुपये होईल. निविष्ठा खर्च कमी केल्यास शेतकर्‍याला 2 लाख रूपयांचा निव्वळ नफा (Net Profit) मिळेल.

शेतकरी बंधुंनो वरील माहिती वाचून तुमच्या मनात सुद्धा रंगीत फुलकोबीची (Coloured Cauliflower) लागवड करण्याची इच्छा निर्माण झालेली आहे का? असल्यास अधिक 9599273766 या नंबर वर संपर्क करा किंवा  [email protected] वर मेल करा.

error: Content is protected !!