Contract Farming : नोकरीला ठोकला रामराम; करार शेतीतून शेतकऱ्याची 1 कोटींची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शेतीमध्ये वेगवेगळे बदल पाहायला (Contract Farming) मिळत आहे. हे बदल प्रामुख्याने आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक अवजारे, नवीन पीक पद्धती यामुळे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्यातून अधिकचे उत्पन्नचे देखील मिळत आहे. प्रामुख्याने कोरोना काळानंतर राज्यात अनेक सुशिक्षित लोकांनी शेतीमध्ये पाऊल ठेवले. त्याचवेळी त्यांना प्रगत साधनांची जोड देखील मिळाली. ज्यामुळे सध्या शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या करार शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी कोरोना काळानंतर नोकरीला रामराम केला. विशेष म्हणजे ते आपल्या करार शेतीतून (Contract Farming) वार्षिक 1 कोटींची कमाई करत आहे.

नोकरीला ठोकला रामराम (Contract Farming Farmer’s Income Of 1 Crore)

सतीश तोमर असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील अलिगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सतीश तोमर हे कोरोना काळापूर्वी मेडिकल क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर काम करत होते. मात्र, कोरोना काळात सर्व ठप्प असताना शेती हे एकमेव क्षेत्र जोमाने सुरु होते. त्यामुळे त्यांनी शेतीची वाट धरण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना करार शेतीतून (Contract Farming) वार्षिक 10 लाख रुपयांची कमाई होत होती. मात्र, सध्या 25 हेक्टरवरील याच करार शेतीच्या माध्यमातून सतीश तोमर हे वार्षिक 1 कोटींची कमाई करत आहे. इतकेच नाही तर आपल्या करार शेतीच्या माध्यमातून त्यांनी 22 लोकांना रोजगार देखील मिळवून दिला आहे.

सेंद्रिय शेतमालाची ऑनलाईन विक्री

सध्या देशभरात करार शेतीची पद्धत वेगाने वाढत आहे. युपीच्या अलिगड जिल्ह्यातील सतीश तोमर यांनी देखील आपल्या कैथवारी गावात आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती करणे सुरु केले. सुरुवातीला त्यांनी आपल्या 10 हेक्टर जमिनीमध्ये जैविक पद्धतीने (Contract Farming) पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. ज्यात हळूहळू वाढ करत सध्या ते 25 हेक्टर जमिनीवर जैविक पद्धतीने पिकांची लागवड करत आहे. विशेष म्हणजे ते आपल्या जमिनीमध्ये उत्पादित सर्व जैविक उत्पादन ऑनलाईन पद्धतीने विक्री करत आहे. तसेच त्यांनी आपल्या उत्पादनांच्या विक्री करता काही कंपन्यांसोबत करार देखील केले आहे. ज्यामुळे त्यांना एक निश्चित उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे.

वार्षिक 1 कोटींचा टर्नओव्हर

परिणामी, करार पद्धतीमध्ये मास्टरी मिळवलेले सतीश तोमर हे जैविक उत्पादनांचे स्टोर उघडण्याच्या तयारीत आहेत. ते आपल्या शेतीमध्ये उत्पादित सर्व शेतमालाला ‘एसआरएच ऑर्गेनिक फूड’ या ब्रँडच्या नावाखाली घरात-घरात पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपण आपल्या शेतीमध्ये उत्पादित सर्व भाजीपाला आणि फळे ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने सहज उपलब्ध करून देत आहोत. सध्या घडीला आपल्याकडे एकूण मल्टीग्रेन आटा, काळा तांदूळ, शेवग्याच्या बिया, हळदी पाउडर, ऑर्गेनिक ऊससहित 16 प्रकारचे जैविक उत्पादने विक्रीसाठी ठेवले आहे. याशिवाय आपण काही शेतमालाच्या विक्रीसाठी कंपन्यांसोबत देखील करारबद्ध आहोत. ज्यातून सध्या 25 हेक्टर जमिनीतून आपल्याला वार्षिक 1 कोटींची कमाई सहज होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!