Coriander Rate : ‘या’ बाजार समितीत कोथिंबिरीच्या जुडीला मिळाला फक्त 51 पैसे भाव; कोथिंबीर उत्पादक शेतकरी चिंतेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Coriander Rate : मागच्या महिन्यात बाजारामध्ये कोथिंबिरीची आवक कमी होती परिणामी कोथंबीरीला जास्त दर मिळत होता. मात्र सध्या बाजारात कोथिंबीरची आवक वाढली आहे. त्यामुळे कोथिंबीरीला म्हणावा असा भाव मिळत नाही कोथिंबीरीला खूपच कमी भाव मिळत असल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकांमध्ये ट्रॅक्टर फिरवले आहेत तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

कोथिंबिरीच्या जुडीला 51 पैसे भाव

दरम्यान, लासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीच्या जुडीला अवघा ५१ पैसे भाव मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेली कोथिंबीर विकण्यापेक्षा ती जनावरांना टाकून संताप व्यक्त केला आहे. जुलै महिन्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची जुडी 22 रुपयांना विकली होती मात्र आता ती जुडी 51 पैशांना विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून आता कोथिंबिरीसाठी झालेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

आवक वाढल्याने दर कमी

दिवसेंदिवस कोथिंबीरीची आवक वाढत चालली आहे यामुळे कोथिंबीरीचे दर देखील खूप कमी होत चालले आहे. शुक्रवारी एका शेतकऱ्याने लासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी ट्रॅक्टर मधून कोथिंबीर आणली होती. मात्र आवक जास्त असल्याने त्यांच्या कोथिंबीरीला फक्त 51 पैसे प्रतिजुडी अशी बोली व्यापाऱ्यांनी लावली. त्यांनी जवळपास 500 जोडी कोथिंबीर विकण्यासाठी आणली होती मात्र व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या भावात त्यांना फक्त 255 रुपये मिळाले असते. त्यामुळे त्यांनी ही विकण्यापेक्षा जनावरांना खाद्य म्हणून टाकून दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत बोलताना शेतकरी म्हणाला की, शेतातून कोथिंबीर काढण्यासाठी तीनशे रुपयांची मजुरी लागते त्याचबरोबर आता जर उरलेली कोथिंबीर पुन्हा विक्रीसाठी आणली तर मजुरांचा खर्च वेगळा त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च हा खूप मोठा खर्च होतो. असे ते हताशपणे सांगत होते. त्यामुळे काढण्यासाठी मजुरी वाया जाऊ द्यायची नाही असा पवित्रा घेत त्यांनी ती स्थानिक स्तरावर विकण्याचा निर्णय घेतला.

शेतमाल : कोथिंबिर (Kothimbir Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/08/2023
कोल्हापूरक्विंटल34100025001750
औरंगाबादनग139003004000350
खेड-चाकणनग45800100500200
राहतानग4350555
हिंगणाक्विंटल5200030003000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल16251530002805
रामटेकहायब्रीडक्विंटल10400050004500
सोलापूरलोकलनग8286200800500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल78100012001100
जळगावलोकलक्विंटल2470020001000
पुणेलोकलनग142630163
पुणे- खडकीलोकलनग1900465
पुणे -पिंपरीलोकलनग600344
पुणे-मोशीलोकलनग23800365
राहूरीलोकलनग3318486
मुंबईलोकलक्विंटल99880014001100
भुसावळलोकलक्विंटल20200030002500
कामठीलोकलक्विंटल5700090008000
रत्नागिरीनं. २नग4000100012001100
error: Content is protected !!