Cotton Crop : पावसाळ्यामध्ये कापसाची काळजी कशी घ्यायची? जाणून घ्या याबाबत माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Crop : राज्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने थैमान घातलेले आहे. अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. नदी नाल्यांना पूर आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांना पाऊस आवश्यक असला तरी काही भागांमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कापसाचे देखील मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पावसाळ्यात कापसाची नेमकी काळजी कशी घ्यावी? याबद्दल माहिती जाणून घेऊयात

कापूस पिकात पाणी साठल्याने कापसाची वाढ थांबून हे पीक खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेतात साठवून असलेले पाणी चर काढून शेताच्या बाहेर काढणे गरजेचे आहे. नाहीतर पाण्यात राहून कापूस सडण्याची देखील शक्यता आहे. (Cotton Crop)

सध्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळत आहे. यामुळे कापसावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासह अनेक कीड रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कीडनाशक आणि बुरशीनाशक औषध वापरून त्यावर नियंत्रण मिळवावे. तेव्हाच तुमचे कापूस पीक चांगले येईल.

खत व्यवस्थापन कसे करावे?

पावसाळ्यामध्ये कापसाचे खत व्यवस्थापन करणे देखील खूप महत्त्वाचे असते. खत व्यवस्थापन करताना एक बॅग, दहा सवीस, अर्धी बॅग युरिया, पाच किलो झिंक सल्फेट, दोन किलो बॉर्यक्स, पाच किलो फेरस सल्फेट, पाच किलो मॅगनेशियम सल्फेट याचा बेसल डोस देणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्ही योग्य कापूस व्यवस्थापन केले तर तुमच्या उत्पादनात देखील वाढ होईल आणि तुम्हाला चांगला नफा मिळेल. या सर्व उपाययोजना करण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे

Hello Krushi ॲप बद्दल तुम्हाला माहिती आहे का

शेतकरी मित्रांनो आम्ही खास शेतकऱ्यांचा विचार करून Hello Krushi हे ॲप बनवले आहे. यामध्ये तुम्ही सरकारी योजना, बाजारभाव, हवामान अंदाज, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी आणि शेतीविषयक अन्य गोष्टींची माहिती मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi ॲप लगेचच इंस्टाल करा.

error: Content is protected !!