Cotton Crop protection: डिसेंबर महिन्यात असे करा कापूस पिकाचे संरक्षण आणि व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Crop protection: सध्या मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सून कापूस बोंड फुटण्याच्या व वेचणीच्या अवस्थेत आहे. जुलै मध्ये पेरणी केलेला कापूस बोंड विकास आणि बोंड फुटण्याच्या टप्प्यावर आहे. तर काही ठिकाणी कापूस वेचणी सुरु आहे.

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे म्हणजे नॉन बीटी आणि बीटी संकरीत कापसावर १० ते १५ टक्केपर्यंत दिसून येत आहे. काही ठिकाणी कापसाच्या पानांवर ठिपके आढळून आले आहे.

शेतकऱ्यांनी पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी दिलेल्या शिफारशीनुसार खालीलप्रमाणे व्यवस्थापन केल्यास नक्कीच फायद्याचे ठरेल.  (Cotton Crop protection)

  • पुढच्या हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डिसेंबरच्या शेवटी कापसाची संपूर्ण वेचणी करावी.
  • नंतरच्या पीक अवस्थेत कपाशीवरील लालसरपणा टाळण्यासाठी १% नत्र आणि १% मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी.
  • गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भावाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर सायपरमेथ्रीन १०% ईसी @ १० ते १५ मिली किंवा सायपरमेथ्रीन २५% ईसी @४ ते ६ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ईसी १० मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८% ईसी @१० मिलि  प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • परिपक्व बोंडे बाहेरील बाजूने कुजू नयेत म्हणून प्रॉपीकोनाझॉल २५  ईसी १ मिली किंवा प्रोपीनेब ७० डब्ल्यू.पी. २.५ ते ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • बोंडे आतून कुजू नये म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यू.पी २५ ते ३० ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून फवारणी करावी. (Cotton Crop protection)
  • पानांवरील बुरशीजन्य ठिपक्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्बेन्डॅझिम १२% +मँकोझेब ६३% डब्ल्यू.पी @ ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी एॅसिटामिप्रिड २० एसपी. @ २ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @३ मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • शेतातून रोगट बोंडे आणि पिकांचे ढिगारे गोळा करून नष्ट करावेत.
  • वेगवेगळा संकरीत कापूस स्वतंत्रपणे साठवावा.
  • लवकर बीटी कापसाच्या वाणांची काढणी केल्यानंतर सिंचनाची सोय असल्यास अधिक आर्थिक फायद्यासाठी रब्बी पीक म्हणू चना किंवा गहू पिकाची लागवड करावी.  
error: Content is protected !!