Cotton Cultivation : खरिपासाठी ‘या’ दिवशी मिळणार कापूस बियाणे; तत्पूर्वी विक्री केल्यास कारवाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कापूस लागवड (Cotton Cultivation) हंगामाबाबत राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात कापूस पिकावर अळींचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी कृषी विभागाने 16 मे 2024 पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. यासंदर्भात कृषी विभागाने विभागीय कृषी सहसंचालक यांना आदेश निर्गमित केले आहे. त्यामुळे आता कृषी विभागाकडून कापूस पिकावरील (Cotton Cultivation) कीड नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न (Cotton Cultivation Seeds For Farmers)

कृषी विभागातील तज्ज्ञांच्या मते, शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगाम पूर्व कापूस लागवड (Cotton Cultivation) झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. ज्यातून या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत यंदा शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता हंगाम पूर्व कापसाची लागवड करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

असे होणार बियाणे वितरण

कृषी विभागाच्या माहितीनुसार, कापूस बियाणे पुरवठा करण्यासाठी पुढीलप्रमाणे निर्देशित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कापूस बियाणे उत्पादक कंपनी ते आपले उत्पादित बियाणे 1 ते 10 मे 2024 या कालावधीत वितरित करू शकणार आहे. त्यानंतर वितरक हा 10 मे 2024 नंतर किरकोळ विक्रेत्यांना हे बियाणे देऊ शकणार आहे. तर 15 मे 2024 नंतरच किरकोळ विक्रेते हे शेतकऱ्यांना कापूस बियाणे विक्री करू शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील 1 जूननंतरच प्रत्यक्ष कापूस लागवड करता येणार आहे. असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कापूस बियाण्याची विक्री दुकानदार शेतकऱ्यांना 15 मे नंतर करू शकतात. परंतु शेतकऱ्यांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता 1 जूननंतरच कापूस बियाण्याची लागवड करावी. असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!