Cotton Cultivation : यंदाच्या खरिपात ‘या’ कापूस वाणांची लागवड करा; मिळेल भरघोस उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड (Cotton Cultivation) केली जाते. कापूस लागवडीच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीत आपल्या राज्याची गेल्या काही वर्षांपासून मक्तेदारी पाहायला मिळत आहे. देशात कापूस लागवड आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हा शीर्ष स्थानावर विराजमान आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कापूस या खरीप हंगामातील मुख्य पिकांची लागवड (Cotton Cultivation) केली जात आहे.

कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढणार (Cotton Cultivation In Maharashtra)

यंदा मात्र मान्सून काळात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने नुकताच जाहीर केला आहे. यामुळे यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्र (Cotton Cultivation) वाढणार असा दावा होऊ लागला आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात कपाशी लागवड करण्याच्या विचारात असाल. तर आज आपण कापसाची दाट लागवड करायची असेल तर कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे. तसेच पाण्याची कमतरता असल्यास कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे. या संदर्भात देखील थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

‘हे’ आहेत प्रमुख तीन कापूस वाण

1. कावेरी सीड्स कंपनीचे जादू : जर तुमच्याकडे हलकी ते मध्यम जमीन असेल तर तुम्ही या वाणाची निवड करू शकता. तुम्हाला कापसाची दाट लागवड करायची असेल तर तुम्ही याची निवड करायला काही हरकत नाही. हा वाण कोरडवाहू तथा बागायती भागात पेरणीसाठी उपयुक्त आहे. सरासरी 155 ते 170 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. चार बाय दीड फूट अंतरावर याची लागवड केली जाऊ शकते. ही जात वेचणीला खूपच सोपी आहे. रसशोषक किडींना ही जात प्रतिकारक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे या जातीपासून चांगले उत्पादन मिळू शकते.

2. ॲग्री सीड्स कंपनीचे युएस 7067 : तुम्हाला कापसाची दाट लागवड करायची असेल तर तुम्ही या जातीची निवड करू शकता. मात्र या जातीच्या कापसाची लागवड मध्यम ते भारी जमिनीत केली पाहिजे. कोरडवाहू तथा बागायती भागात याची लागवड केली जाऊ शकते. अवरेज 155 ते 160 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते. म्हणजेच कापसाचे हे एक लवकर परिपक्व होणारे वाण आहे.

पाण्याची कमतरता असल्यास कोणत्या कापूस वाणाची निवड करावी?

3. अजित सीड्स कंपनीचे अजित 155 कापूस वाण : तुमच्याकडे जर पाण्याची कमतरता असेल आणि तुम्हाला कापसाची लागवड करायची असेल तर अजित सीड्स कंपनीचे अजित 155 हे वाण तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी पाण्यातूनही अजित सीड्स कंपनीच्या या जातीपासून चांगले विक्रमी उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. या जातीची लागवड हलक्या ते मध्यम जमिनीत केली जाऊ शकते. कोरडवाहू तथा बागायती भागात ही जात पेरणीसाठी उपयुक्त असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे. 145 ते 160 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.

error: Content is protected !!