Cotton Export : भारतीय कापूस निर्यातीत 137 टक्क्यांनी वाढ; हंगामातील दर घसरणीचा परिणाम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र (Cotton Export) मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्र हे राज्य कापूस लागवडीसह उत्पादनाच्या बाबतीत देशात पहिल्या स्थानी आहे. यंदा देशातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण अल्प राहिले असले तरी, भारताची कापूस निर्यात 137 टक्क्यांनी वाढून 18 लाख गाठींवर पोहचली आहे. प्रामुख्याने ऑक्टोबर-मार्च या कालावधीत भारतीय किमती कमी राहिल्याने कापूस निर्यात (Cotton Export) वाढली आहे. असे भारतीय कापूस महामंडळाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

कापूस निर्यात 18 लाख गाठींवर (Cotton Export From India)

भारतीय कापूस महामंडळाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2023 ते मार्च 2024 या सहा महिन्यांदरम्यान भारताची कापूस निर्यात (Cotton Export) 137 टक्क्यांनी वाढून 18 लाख गाठींवर गेली आहे. भारताने 2022-23 हंगामात 15.59 लाख गाठींची निर्यात केली होती. सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी म्हटले आहे की, ऑक्टोबर-मार्च या कालावधीत भारतीय किमती कमी राहिल्याने निर्यात वाढली. आंतरराष्ट्रीय किमतीपेक्षा भारतीय कापूस प्रति कँडी 3 ते 4 हजार रुपयांनी स्वस्त होता. अलीकडच्या आठवड्यात जागतिक किमती कमी झाल्यामुळे, कॉटलुक इंडेक्सच्या तुलनेत भारतीय किमती आता समतुल्य किंवा किंचित महाग आहेत.

अंदाजापेक्षा अधिक निर्यात

दरम्यान सीएआयने हंगामाच्या सुरुवातीला आपल्या अंदाजात म्हटले आहे की, “देशभरात यावर्षी 311 लाख गाठी कापसाची मागणी कायम राहणार आहे. तर यावर्षी 14 लाख गाठी कापूस निर्यात (Cotton Export) केला जाऊ शकतो. जो मागील हंगामात 15.59 लाख गाठी इतका करण्यात आला होता. मात्र, यंदा सीएआयच्या अंदाजापेक्षा अधिक कापूस निर्यात झाली आहे. तर यावर्षी 22 लाख गाठी कापसाची आयात केली जाऊ शकते. जी मागील हंगामात 12.5 लाख गाठी नोंदवली गेली होती.”

error: Content is protected !!