Cotton Market Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापूस भावात सुधारणा; या बाजारात मिळाला विक्रमी दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: विजयादशमीपासून सुरू झालेल्या हंगामात दबावात असलेले कापसाचे भाव (Cotton Market Rate) आता हंगामाच्या (Cotton Season) अंतिम टप्प्यात वाढू लागले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी (Cotton Growing Farmer) ही दिलासादायक बातमी आहे.

काल 13 एप्रिल 2024 रोजी राज्यातील मराठवाडा विभागातील फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर (Cotton Market Rate) मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल 145 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची (Staple Cotton) आवक झाली.

कालच्या लिलावात या मार्केटमध्ये कापसाला किमान कमाल आणि सरासरी 8200 रुपये प्रति क्विंटल असा दर (Cotton Market Rate) मिळाला आहे. राज्यातील इतर बाजारात (Cotton Market) मात्र कापसाचे भाव अजूनही 8000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा खालीच आहेत.

पण फुलंब्री व आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्‍यांना या भाव वाढीचा फायदा झाला आहे.

राज्यातील इतर बाजारांमध्ये काल कापसाला मिळालेले भाव खालील प्रमाणे आहेत (Cotton Market Rate)

नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती: या बाजारात कापसाला किमान 6300, कमाल 7300 आणि सरासरी 6800 असा भाव मिळाला आहे.

सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये मध्यम स्टेपल कापसाला किमान 7000, कमाल 7690 आणि सरासरी 7250 असा भाव मिळाला आहे.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये कापसाला किमान 6 हजार, कमाल 7650 आणि सरासरी 6500 असा भाव मिळाला आहे.

वरोरा खांबाडा कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये काल कापसाला किमान 6200, कमाल 7550 आणि सरासरी 7000 असा भाव मिळाला आहे.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती: या बाजारात पांढऱ्या सोन्याला किमान 6750, कमाल 7550 आणि सरासरी 7000 असा भाव मिळाला आहे.

देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती: मार्केटमध्ये काल कापसाला किमान 7000, कमाल 7720 आणि सरासरी 7500 रुपये असा भाव मिळाला आहे.

पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती: या मार्केटमध्ये कापसाला किमान 7000, कमाल 7200 आणि सरासरी 7100 असा भाव मिळाला आहे.

मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती: या बाजारात कापसाला किमान 6950, कमाल 7550 आणि सरासरी 7250 असा भाव मिळाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती: काल या मार्केटमध्ये कापसाला किमान 6900, कमाल 7400 आणि सरासरी 7150 असा भाव मिळाला आहे.

error: Content is protected !!