Cotton Market Rate : कापूस दरात वाढ; पहा आपल्या बाजार समितीतील दर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीपूर्वी सात हजार रूपये प्रतिक्विंटल विकल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात (Cotton Market Rate) मागील दोन ते तीन दिवसांत काहीशी वाढ नोंदवली गेली आहे. अकोला जिल्यातील अकोट बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल 7 हजार 825 रूपये दर (Cotton Market Rate) मिळाला आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही मागील दोन ते तीन दिवसात काहीसे दर वाढले असल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी (ता.18) राज्यातील सर्वाधिक दर मिळालेल्या बाजार समित्यांमधील दर पुढीलप्रमाणे आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीत कापसाला शनिवारी कमाल 7500 रुपये तर किमान 7000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. परभणी जिल्ह्यातील मनवत बाजार समितीत कापसाला कमाल 7475 रुपये तर किमान 7100 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर बाजार समितीत कापसाला कमाल 7375 रुपये तर किमान 7350 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.

कमी दर मिळालेल्या बाजार समित्या (Cotton Market Rate In Maharashtra)

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बाजार समितीत कापसाला कमाल 7350 रुपये ते किमान 7000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत कापसाला कमाल 7300 रुपये ते किमान 7100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वर्धा जिल्ह्यातील सेलू बाजार समितीत कापसाला कमाल 7272 रुपये ते किमान 7200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर नांदेड, सावनेर (नागपूर), यावल (जळगाव), हिंगणा(नागपूर), उमरेड(नागपूर) या बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर काहीसे कमाल 7100 रुपये ते 6800 रुपये प्रति क्विंटल दरम्यान रेंगाळताना दिसले.

बाजारातील साशंकता

दरम्यान, कापूस दर आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने मागील हंगामातील आपला कापूस साठवून ठेवला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता दरवाढीचा फायदा होणार आहे. यावर्षी राज्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने राज्यातील कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी अधिकाधिक कापूस मिळण्यासाठी ही दरवाढ केली आहे. मात्र आता येत्या काळात हे दर टिकून राहतील की नाही? याबाबत सध्यस्थितीत काहीही बोलले जाऊ शकत नाही.

error: Content is protected !!