Cotton Market Rate: राज्यात कापसाला मिळतोय हमीभावाहून अधिक दर! उत्पादनात घट झाल्याचे परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा कापसाच्या (Cotton Market Rate) कमी उत्पादनाचा अंदाज असताना महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या कापसाला हमीभावाहून (MSP) अधिक भाव मिळत असल्याचे पणन विभागाने दिलेल्या माहितीवरून समजते.

दरम्यान, राज्यातील बहुतांश बाजार समितीमध्ये कापसाचा भाव (Cotton Rate) 6500 ते 8000 रुपये सुरू आहे. यंदा कापसाचा भाव (Cotton Market Rate) 10 हजार रुपये क्विंटल पर्यंत पोहचेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

यंदा कापसाचे उत्पादन कमी

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार 2023-24 या वर्षात 323.11 लाख गाठी कापसाचे उत्पादन (Cotton Production) झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे कमी आहे. गेल्या आठवड्यात कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर भावात काही सुधारणा होण्याची अपेक्षा होती. यंदा अवकाळी पावसाने गुलाबी बोंड अळीचा (Cotton Pink Bollworm) प्रादुर्भाव तसेच अल निनोच्या (el nino) परिणामामुळे कापसाचे उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे.

बाजार समितीत काय मिळतोय भाव? (Cotton Market Rate)

छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री बाजार समितीत (Bajar Samiti) सोमवारी मध्यम स्टेपल कापसाला क्विंटलमागे सर्वसाधारण 8000 रूपयांचा भाव मिळाला. तर बहुतांश ठिकाणी  7000 रुपये क्विंटलच्या वर हा भाव गेल्याचे दिसते.

मंगळवारी एच 4 मध्यम स्टेपल कापसाला 7 हजाराहून अधिक भाव मिळत असल्याने आवकही होती. दरम्यान आज बुधवार दि 24 रोजी सकाळच्या सत्रात 553 क्विंटल कापसाची आवक झाली असून 7100 ते 7500 रूपयांचा भाव मिळत आहे.

आज 24 एप्रिल 2024 ला बुलढाणा येथे लोकल कापसाची 423 क्विंटल आवक झाली असून, तेथे कापसाला सर्वसाधारण दर 7500 रूपये मिळाला असून, कमीत कमी दर 7000 तर जास्तीत जास्त दर 7800 रूपये मिळाला आहे.

चंद्रपूर येथे लोकल कापसाची (Cotton) 130 क्विंटल आवक झाली असून, तेथे कापसाला सर्वसाधारण दर 7150 रूपये मिळाला असून, कमीत कमी दर 6000 तर जास्तीत जास्त दर 7400 रूपये मिळाला आहे.

काय आहे कापसाची आधारभूत किंमत? (Cotton MSP)

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कापसाच्या दोन मूळ वाणांची आधारभूत किंमत ठरवली आहे. त्यानुसार मध्यम स्टेपल व लाँग स्टेपल कापसाची आधारभूत किंमत 6080 व 6380 रुपये असा आहे (Cotton Market Rate).

error: Content is protected !!