Cotton Market । मागच्या काही दिवसापासून कापसाच्या दरावरून शेतकरी चांगलेच नाराज असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचे दर वाढतील या आशेने कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र दर न वाढल्याने आणि पेरणीच्या वेळी पैशांची गरज भासल्याने अनेक शेतकऱ्यांनी आहे त्या भावामध्ये कापूस विकला आहे मात्र सध्या कापसाच्या भावात तेजी असल्याचे दिसत आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
कापूससाठा संपताच दरवाढीची शक्यता (Cotton Rate)
सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी घरामध्ये साठवणूक करून ठेवलेला कापूस विकून टाकला आहे. मात्र शेतकऱ्यांकडे कापूससाठा संपताच दरवाढीची चाल दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वातावरण पाहायला मिळत आहे. मागील वेळेस देखील ९५ टक्के शेतकऱ्यांच्या कापसाची सरासरी आठ हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी झाली आणि दरवाढ झाली.
सध्या सण उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे बाजारामध्ये कापडाला मोठी मागणी आहे आणि कापडाला मागणी असल्यामुळे कापसाला देखील मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे. त्याचबरोबर कापसाची मागणी वाढत आहे आणि बाजारामध्ये कापसाची आवक कमी आहे. यामुळे कापसाचे दर वाढत असल्याचे बोलले जात आहे. पुढील आगामी काळामध्ये कापसाचे दर चांगले वाढतील असे देखील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सध्याच्या हंगामामध्ये कापसाचे उत्पादन जगभरामध्ये कमी आहे. जगात 25 दशलक्षणांच्या उत्पादनाचा अंदाज होता. मात्र उत्पादन सुमारे 23 दशलक्ष टन एवढेच आत येईल असे दिसत आहे. याबाबतचे आकडे सप्टेंबर 2023 पर्यंत समोर येतील.
या ठिकाणी मोफत पहा कापसाचे बाजार भाव
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कापसाचे मोफत बाजार भाव पाहिजे असतील तर तुम्हाला एक छोटे काम करायचे आहे. तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करायचे आहे हे ॲप आम्ही खास शेतकऱ्यांचा विचार करून बनवले आहे. यामध्ये तुम्ही रोजचे बाजार भाव हवामान अंदाज, सरकारी योजनांची माहिती, सातबारा उतारा, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळू शकता. त्यामुळे लगेचच प्ले स्टोअर वर जाऊन हॅलो कृषी हे अँप इंस्टाल करा.
शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
11/08/2023 | ||||||
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 188 | 6800 | 7050 | 6950 |
काटोल | लोकल | क्विंटल | 12 | 6800 | 7100 | 6950 |
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 141 | 5990 | 6850 | 6530 |
10/08/2023 | ||||||
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 773 | 7500 | 7600 | 7550 |
काटोल | लोकल | क्विंटल | 20 | 7000 | 7200 | 7100 |
खामगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 16 | 6500 | 7650 | 7075 |
पुलगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 149 | 7350 | 7500 | 7400 |