Cotton Production : कापूस उत्पादन 294.10 लाख गाठी होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कापूस महामंडळाने (सीएआय) चालू आर्थिक वर्षात कापूस उत्पादन (Cotton Production) 294.10 लाख गाठी (1 कापूस गाठ = 170 किलो) इतके राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हरियाणा राज्यांमध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्तर भारतातील उत्पादनात (Cotton Production) एक लाख गाठींनी घट होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कापूस महामंडळाने आपला नवीन अंदाज प्रसिद्ध केला असून, कापूस उत्पादनात घट होणार असल्याचे म्हटले आहे.

भारतीय कापूस महामंडळाने (सीएआय) आपल्या नवीन अंदाजात म्हटले आहे की, ‘ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024′ या कालावधीत देशातील कापूस उत्पादन 294.10 लाख गाठी इतके राहू शकते.’ जे मागील वर्षीच्या हंगामात (ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023) 311.63 लाख गाठी इतके नोंदवले गेले होते. दरम्यान, सीएआयने आपल्या मागील अंदाजात देशातील कापूस उत्पादन यावर्षी 295.10 लाख गाठी राहणार असल्याचे म्हटले होते. मात्र आता नवीन अंदाज प्रसिद्ध करत सीएआयने त्यात 1 लाख गाठींची घट होणार असल्याचे म्हटले आहे.

प्रदेशनिहाय कापूस उत्पादन (Cotton Production In India)

उत्तर भारतामध्ये (पंजाब, हरियाणा आणि राजस्थान) यावर्षी 40.66 लाख गाठी इतके कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. जे मागील अंदाजात सीएआयने यावर्षी 41.66 लाख गाठी होणार असल्याचे म्हटले होते. मध्य भारतात (गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश) यावर्षी 175.65 लाख गाठी इतके कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी (ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023) याच कालावधीत 190.67 लाख गाठी इतके नोंदवले गेले होते. मध्य भारतात उत्पादनातील ही घट पावसाअभावी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दक्षिण भारतात (तेलंगाना, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू) यावर्षी 65.60 लाख गाठी इतके कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी (ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023) याच कालावधीत 72.95 लाख गाठी इतके नोंदवले गेले होते.

311 लाख गाठींची मागणी

दरम्यान सीएआयने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, देशभरात यावर्षी 311 लाख गाठी कापसाची मागणी कायम राहणार आहे. यावर्षी 14 लाख गाठी कापूस निर्यात केला जाऊ शकतो. जो मागील हंगामात 16.27 लाख गाठी इतका करण्यात आला होता. तर यावर्षी 22 लाख गाठी कापसाची आयात केली जाऊ शकते. जी मागील हंगामात 12.5 लाख गाठी नोंदवली गेली होती.

error: Content is protected !!