Cotton Purchase : यंदा देशात आतापर्यंत 32.85 लाख गाठी कापसाची सरकारी खरेदी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कापूस महामंडळाने (सीआयआय) 2023-24 या संपूर्ण वर्षात (Cotton Purchase) किमान आधारभूत किमतीने (एमएसपी) एकूण 32.85 लाख गाठी (१ गाठ म्हणजे 170 किलो) कापसाची खरेदी केली आहे. यातील सर्वाधिक कापूस खरेदी ही तेलंगणा या राज्यामध्ये करण्यात आली. तेलंगणामध्ये यावर्षी 24 लाख कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रामध्ये 27 मार्च 2024 पर्यंत एकूण 2.44 लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे. याशिवाय आंध्रप्रदेश या राज्यामध्ये 1.30 लाख गाठी कापूस, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आतापर्यंत 1.27 लाख गाठी कापूस खरेदी (Cotton Purchase) करण्यात आला आहे.

एकूण उत्पादनापैकी 10 टक्के खरेदी (Cotton Purchase 32.85 Lakh Bales In Country)

भारतीय कापूस महामंडळाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 यावर्षी आतापर्यंत गुजरात या राज्यामध्ये 0.91 लाख गाठी कापूस, ओडिसामध्ये 0.95 लाख गाठी, कर्नाटकमध्ये 0.62 लाख गाठींची कापसाची खरेदी (Cotton Purchase) करण्यात आली आहे. याशिवाय राजस्थानमध्ये 0.52 लाख गाठी, हरियाणा 0.43 लाख गाठी, पंजाब 0.38 लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे. दरम्यान, देशातील एकूण कापूस उत्पादनापैकी सीआयआयकडून आतापर्यंत 10 टक्के कापसाची सरकारी खरेदी करण्यात आली आहे.

323.11 लाख गाठी उत्पादनाचा अंदाज

दरम्यान, सीआयआयकडून चालू हंगामातील कापूस उत्पादनाचा सुधारित अंदाज 323.11 लाख गाठी इतका वर्तवण्यात आला आहे. जो नोव्हेंबर 2023 मध्ये 316.57 लाख गाठी इतका वर्तवण्यात आला होता. विशेष म्हणजे मागील दीड महिन्यापासून खुल्या बाजारात कापसाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक राहिल्याने सरकारी कापूस खरेदी घटली आहे. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना सध्या हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. ज्यामुळे शेतकरी सरकारी कापूस खरेदी केंद्राऐवजी थेट बाजारात विक्री करण्यावर भर देत आहे.

कापसाचे दर स्थिर

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापसाला 7,500 ते 7,800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. तर काही बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर सध्या ८३०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. कापूस व्यापारातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, सध्या देशातील बाजार समित्यांमध्ये दररोज एकूण 80,000 ते 1,00,000 लाख गाठी कापूस आवक होत आहे. तर देशातील दररोजची एकूण मागणी ही 85,000 गाठी इतकी आहे. ज्यामुळे सध्या गुणवत्तापूर्ण कापसाला चांगला दर मिळत आहे.

error: Content is protected !!