Cotton Rate : महाराष्ट्रात कापसाचे भाव न वाढल्याने शेतकरी नाराज आहेत. सध्या महाराष्ट्रात कापसाचा भाव ७००० रुपये प्रति क्विंटल आहे. कापसाच्या दरात झालेली वाढ थांबल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 10,000 रुपयांपर्यंत भाव वाढण्याची त्यांची अपेक्षा होती, मात्र आता तसे होताना दिसत नाही. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
भाव वाढतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र अजूनही भाव वाढले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला कापूस विक्रीसाठी काढला आहे. शेतकरी थोडा थोडा करून कापूस विकताना दिसत आहेत. त्याचबरोबर बाजारपेठेचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना कापूस विकण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञ देत आहेत. (Cotton Rate)
कापसाच्या भावात दररोज चढउतार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान आज कापसाला किती भाव मिळाला याबद्दल जाणून घेऊया. आज कापसाला सिंदी(सेलू), पारशिवनी, सेलू या ठिकाणी ७३०० रुपयांपर्यंत जास्तीचा दर मिळाला आहे. मागच्या वेळच्या भावाच्या तुलनेत आजचेही भाव कमीच आहेत.
‘या’ ठिकाणी पाहा कापसाचे दर
तुम्हालाही घरबसल्या कापूस व इतर शेतमालाचे भाव पाहायचे आहेत का? तर मग लगेचच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे आपले अँप डाउनलोड करा यामध्ये तुम्हाला रोजचे ताजे बाजारभाव पाहायला मिळतील ते ही अगदी मोफत. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच प्लेस्टोअरवर जा आणि आपले Hello Krushi हे आपले अँप इंस्टाल करा.
शेतमाल : कापूस (Cotton rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
22/07/2023 | ||||||
सेलु | — | क्विंटल | 1532 | 7225 | 7350 | 7310 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 175 | 6900 | 7100 | 7000 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 190 | 7200 | 7215 | 7210 |
21/07/2023 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 350 | 6900 | 6900 | 6900 |
सेलु | — | क्विंटल | 1845 | 6200 | 7360 | 7250 |
आष्टी (वर्धा) | ए.के.एच. ४ – लांब स्टेपल | क्विंटल | 304 | 5000 | 6950 | 6900 |
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 668 | 7000 | 7040 | 7020 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 270 | 6800 | 7100 | 7000 |
मनवत | लोकल | क्विंटल | 2500 | 6200 | 7370 | 7250 |
वरोरा-माढेली | लोकल | क्विंटल | 18 | 0 | 6900 | 0 |
काटोल | लोकल | क्विंटल | 120 | 6700 | 7050 | 6800 |
हिंगणघाट | मध्यम स्टेपल | क्विंटल | 1250 | 6700 | 7245 | 6700 |
पुलगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 300 | 6900 | 7100 | 7050 |
सिंदी(सेलू) | मध्यम स्टेपल | क्विंटल | 250 | 7185 | 7215 | 7200 |