Cotton Rate : यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी होणार मालामाल? ‘ही’ आंतरराष्ट्रीय कापसाची स्थिती ठरेल कारणीभूत; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cotton Rate : मागील वर्षी कापसाचे दर दहा ते बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत होते. यंदाही हे दर कमालीचे घसरले असलयाने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तर साठवलेला कापूस विकून टाकला आहे. तर काही शेतकऱ्यांनी कापसाचे दर पुन्हा वाढतील या आशेने कापूस घरातच साठवून ठेवला आहे. किमान यावर्षी कापसाला चांगले दर मिळतील का याकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

याच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे. यंदा कापसाला चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे. चीन हा देश कापूस उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर असतो. भारतातदेखील कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. परंतु यावर्षी चीनचे कापूस उत्पादन 12 टक्के आणि भारताचे उत्पादन दोन टक्क्याने कमी होईल, असे मत जाणकरांनी व्यक्त केले आहे.

कापसाला सध्या किती बाजारभाव मिळतोय

कापसाला बाजारातील परिस्थिती कशी आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करा. या अँपच्या माध्यमातून तुम्ही कापसाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता त्याचबरोबर इतर शेतमालाचे देखील बाजारभाव पाहू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त बाजारभाव नाही तर हवामान अंदाज, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री, जुगाडांची माहिती, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा या सर्व गोष्टींची अगदी मोफत माहिती मिळवू शकता.

जरी उत्पादन कमी होत असले तरी देशातील कापसाचा वापर चार टक्क्यांनी वाढेल. शिवाय अमेरिका आणि ब्राझीलमध्येदेखील वापर वाढू शकतो. एकंदरीतच जगाला 70% कापूस पुरवठा करणाऱ्याच देशांमध्ये कापसाचे उत्पादन घातले आहे. त्यामुळे येत्या काळात कापसाच्या दरात वाढू होऊ शकते. यावर्षी का होईना पण शेतकऱ्यांना कापसामुळे अच्छे दिन येतील.

कापसाचे भाव चांगले राहतील म्हणजे कशी असेल परिस्थिती?

कापसाचे भाव चांगले राहतील म्हणजे ते वाढतच राहतील असे नाही. कापसाच्या बाजारभावामध्ये सातत्याने चढउतार झालेला पाहायला मिळतो. आपल्याकडे असे अनेक शेतकरी आहेत जे कापसाचे भाव वाढतील या आशेने कापसाची विक्री करत नाही त्याची साठवणूक करतात. मात्र काही कारणास्तव जो भाव आहे त्याच्यापेक्षा देखील खाली भाव घसरतात व आपल्याला पश्चाताप होतो. याकरता शेतकऱ्यांनी एका क्विंटलसाठी किती खर्च आला याचे गणित काढून कापसाची विक्री करावी ते फायद्याचे ठरू शकते.

दरम्यान, यावर्षी देशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वात मोठा फटका शेतीला बसला आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसालादेखील त्याचा फटका बसला आहे. पावसामुळे यावर्षी कापसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.

error: Content is protected !!