Cotton Rate : मागच्या काही दिवसापासून कापसाचे दर पाहिले तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या दरावरून नाराजी आहे. मात्र आता बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र पेरणीच्या काळी पैशांची गरज भासल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विकला आहे. आता अगदी बोटावर मोजण्या एवढ्या शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला आहे. दरम्यान आता कापूस बाजारतून शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. काल देशातील बाजारामध्ये कापूस दरात जवळपास 300 ते 500 रुपयांची सुधारणा दिसून आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट महिन्यात कापूस दरामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कापूस दर वाढण्याचे संकेत मागच्या आठवड्यापासूनच मिळत होते. माहितीनुसार, अमेरिकेतील महत्त्वाच्या कापूस उत्पादक भागांमध्ये उष्णतेचा फटका बसत आहे. त्याचबरोबर चीनकडून कापसाला मागणी वाढत आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळत आहे. (Cotton Rate)
कापूस वायद्यांमध्ये चढ उतार
मागच्या आठवड्यापासूनच कापूस वायद्यांमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. काल नोव्हेंबर चे वायदे ६० हजार ४८० रुपयांवर होते. नोव्हेंबरच्या वाद्यांमध्ये काल चांगली वाढ झाली होती. देशात सणांच्या पार्श्वभूमीवर कापसाची मागणी वाढत असल्याचे बोलले जात आहे. सध्या अनेक सण उत्सव आले आहेत त्यामुळे कापडाची देखील मोठी मागणी असते. त्यामुळे कापसाला मागणी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
काल कापसाच्या दरात चांगली सुधारणा दिसून आली. कापसाच्या भावात क्विंटल मागे तीनशे ते पाचशे रुपयांची सुधारणा झाली होती. त्यामुळे देशांमधील बाजारामध्ये कापसाला गुणवत्तेप्रमाणे जवळपास 6700 ते 7300 रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात कापसाचे दर याच्यापेक्षा जास्त वाढतील अशी आशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे. कापसाचा कमाल भाव काही बाजार मध्ये तर 7500 रुपयांवर पोहोचलेला होता.
तुम्हाला जर कापूस विकायला नेण्याच्या आधी कापसाचे दर जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टाल करावे लागेल हे ॲप मोबाईल मध्ये इंस्टाल केल्यानंतर तुम्ही तुमच्या कापसाला किती भाव मिळतोय हे चेक करू शकता त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच प्लेस्टोर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करा.
दरम्यान, कापसाच्या भावात पुढच्या काळात चढ-उतार दिसू शकतात. मात्र दरातील वाढ जास्त कमी होणार नसल्याचे देखील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कापूस दरामध्ये चालू ऑगस्ट महिन्यामध्ये किमान पाचशे रुपयांची सुधारणा दिसू शकते. असा अंदाज देखील जानकरांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता कापूस दर किती पर्यंत जातील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शेतमाल : कापूस (Cotton Rate)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
08/08/2023 | ||||||
आष्टी (वर्धा) | ए.के.एच. ४ – लांब स्टेपल | क्विंटल | 154 | 6500 | 7500 | 7400 |
काटोल | लोकल | क्विंटल | 22 | 6800 | 7100 | 7000 |
07/08/2023 | ||||||
सेलु | — | क्विंटल | 1305 | 6450 | 7680 | 7600 |
सिरोंचा | — | क्विंटल | 160 | 6700 | 7200 | 6800 |
आष्टी (वर्धा) | ए.के.एच. ४ – लांब स्टेपल | क्विंटल | 111 | 6500 | 7500 | 7400 |
काटोल | लोकल | क्विंटल | 45 | 6700 | 7100 | 6900 |
खामगाव | मध्यम स्टेपल | क्विंटल | 275 | 6600 | 7550 | 7075 |