Cotton Rate : कापसाच्या दरात लपंडाव, कधी घट तर कधी वाढ; पहा जिल्हानिहाय बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही महिन्यांपासून कापसाच्या दरात चढ – उतार पहायला मिळत आहे. कापूस पिकाचे दर हे ७ ते साडे सात हजार पहायला मिळत होते. मात्र कधी कधी हेच दर ८ हजारांवर सुदधा जातात. महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पाऊस असला तरीही कापसाच्या दरात फारशी तफावतात पहायला मिळाली नाही.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज राज्यातील कापूस पिकाचे बाजारभाव आणि आवकाबद्दल बोलायचं झालं तर किनवट बाजारसमितीत कापसाची सर्वाधिक कमी आवक ही ३८ आहे. हिंगणघाट बाजारसमितीत सर्वाधिक ८ हजार ३५ दर कापसाला मिळाला आहे. तर दुसरीकडे मनवत बाजारसमितीत सर्वात कमी दर हा ६ हजार ५०० आहे. तसेच इतर बाजारसमित्यांमध्ये कापसाचे दर आणि आवक जाणून घ्यायची असल्यास खालील तक्ता पहावा.

पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी हे नक्की करा

शेतकरी शेतात पीक फुलवतो. मात्र ते पीक फुलवून त्याला चांगला बाजारभाव मिळणे देखील गरजेचं आहे. त्यासाठी त्या पिकाची आवक किती झाली. तसेच बाजारभावात किती प्रमाणात चढ – उतार पहायला मिळाला. हे शेतकऱ्याला ठाऊक असणे गरजेचे आहे. यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही कोणत्या पिकांचा रोजचा बाजारभाव पाहायचा असेल तर आजच Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही सर्व पिकांचे रोजचे बाजारभाव घरबसल्या आणि मुख्य म्हणजे अगदी फुकट मध्ये पाहू शकता. त्यासाठी आजच गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हेअँप डाउनलोड करा आणि मोफत मध्ये सर्व सुविधांचा लाभ घ्या.

शेतमाल : कापूस (Cotton Rate)

प्रती युनिट ( रू.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/04/2023
सावनेरक्विंटल1800775077507750
मनवतक्विंटल4160650079807900
सेलुक्विंटल3091680080157950
किनवटक्विंटल38710075007350
समुद्रपूरक्विंटल891740078507700
वडवणीक्विंटल4750075007500
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल17705076007559
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल2880720079007565
उमरेडलोकलक्विंटल945740077307550
वरोरालोकलक्विंटल1012700078007400
काटोललोकलक्विंटल156770078507750
कोर्पनालोकलक्विंटल2248720076007400
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल190750078507750
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल2720775079657900
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल7502720080357605
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल890745578507650
यावलमध्यम स्टेपलक्विंटल53740078507540
नरखेडनं. १क्विंटल126770079007850

error: Content is protected !!