Cotton Varieties : तीन नवीन कापूस वाण विकसित; कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन वाण (Cotton Varieties) विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने हे वाण विकसित केले असून, जवळपास 8 वर्ष यासाठी संशोधन करण्यात आले आहे. या वाणाला केंद्र सरकारच्या केंद्रीय वाण प्रसारण समितीने मध्य भारतात लागवड करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे आता लवकरच हे तीन वाण (Cotton Varieties) शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. असे विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राने म्हटले आहे.

तीन संशोधित वाण (Cotton Varieties Developed Agriculture University)

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठा कापूस संशोधन केंद्रात २०१५ पासून एन.एच.१९०१, एन. एच. १९०२ व एन. एच. १९०४ या बीटी कापूस वाणांवर संशोधन सुरु होते. हे वाण (Cotton Varieties) विद्यापीठाच्या नांदेड येथील संशोधन केंद्रात संशोधित करण्यात आले आहे. हे वाण मुख्यतः सरळ असल्यामुळे मागील वर्षीच्या कपाशीपासून सरकी वेगळी करून पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरता येणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी बियाणे खरेदी करण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता असणार नाही. बियाण्यांवरील खर्चही कमी करण्यास मदत होणार आहे. असेही कापूस संशोधन केंद्राने म्हटले आहे. त्यामुळे आता या कापूस बियाण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

वाणाची वैशिष्ट्ये

केंद्र सरकारच्या केंद्रीय वाण प्रसारण समितीने शिफारस केलेले हे वाण (Cotton Varieties) कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे ते रस शोषक किडींबाबत सहनशील असून, त्याच्या धाग्याची लांबी मध्यम असते. या वाणापासून हेक्टरी १६ ते १८ क्विंटल उत्पादन मिळते. याची शिफारस प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. असेही नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने म्हटले आहे. दरम्यान, मोठ्या आकाराच्या सरळ व संकरीत वाणांची पैदास करणे, सधन लागवडीसाठी अनुकूल वाणांची पैदास, उत्पादन वाढ करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे, गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञान या विविध विषयांवर संशोधन सुरू असल्याचेही कापूस संशोधन केंद्राने म्हटले आहे.

error: Content is protected !!