Cotton Variety : कापसाचे ‘हे’ तीन वाण कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान; विक्रमी उत्पादन मिळणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस हे राज्यातील प्रमुख पीक असून, विदर्भ मराठवाडा भागात कापूस पिकाखालील क्षेत्र (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करतात. यंदाही चांगल्या पावसाचे संकेत असून, शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी बियाणे चाचपणीची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण कापसाच्या अलीकडेच विकसित झालेल्या तीन नवीन जातींची माहिती जाणून आहोत. विशेष म्हणजे या नव्याने विकसित झालेल्या जाती यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना (Cotton Variety) उपलब्ध होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

‘या’ आहेत तीन जाती? (Cotton Variety For Farmers)

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी अंतर्गत येणाऱ्या कापूस संशोधन केंद्राने (Cotton Variety) मागील पंधरवड्यात आठ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनानंतर आणि प्रचंड मेहनती नंतर कापसाचे तीन सरळ बीटी वाण तयार केले आहेत. विशेष म्हणजे केंद्राच्या समितीने या वाणाला मध्य भारतात लागवडीसाठी शिफारस केली आहे. कृषी विद्यापीठाने एन.एच.1901, एन. एच. 1902 व एन. एच. 1904 या तीन कापसाच्या जाती विकसित केल्या आहेत. या जातीची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे कोरडवाहू भागात लागवड केली तरीही यातून दर्जेदार उत्पादन मिळू शकणार आहे. या कापसाच्या मध्यम धाग्याच्या जाती आहेत.

‘या’ राज्यांसाठी असेल फायदेशीर

रसोशक किडींसाठी या तिन्ही कापूस जाती (Cotton Variety) प्रतिकारक असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तिन्ही राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी या जातीचे कापूस वाण विशेष फायदेशीर ठरणार असा दावा विद्यापीठाच्या कृषी संशोधकांनी केला आहे. या जातीपासून हेक्टरी 16 ते 18 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा दिलासा

निश्चितच कोरडवाहू भागात या तिन्ही जाती चांगले उत्पादन देण्यास सक्षम राहणार असल्याने याचा राज्यातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.हे तीनही वाण बीटी स्वरुपातील आहेत आणि हे वाण हिरवी बोंडअळी व ठिपक्याची बोंडअळी प्रतिकारक राहणार असे संशोधकांनी सांगितले आहे. यामुळे या जातीपासून अधिकचे उत्पादन मिळणार अन उत्पादन खर्चात बचत होणार आहे.

error: Content is protected !!