Cotton Variety : ‘हे’ आहेत लवकर काढणीला येणारे कापूस वाण; वाचा… त्यांची वैशिष्ट्ये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक (Cotton Variety) आहे. या पिकाची आपल्या राज्यातच नाही तर संपूर्ण भारतभर लागवड केली जाते. कापूस शेती खरीप हंगामात होते. दरम्यान भारतीय हवामान विभागाने यंदा समाधानकारक मान्सूनची शक्यता वर्तवली असल्याने यावर्षी कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता देखील आहे. अशातच लवकर काढणीसाठी येणारे चांगले वाण कोणते? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित होत असतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण कापसाच्या लवकर काढणीला येणाऱ्या जातींबद्दल (Cotton Variety) माहिती जाणून घेणार आहोत.

हे’ आहेत लवकर काढणीला येणारे वाण (Cotton Variety For Farmers)

कबड्डी : महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय वाण म्हणून याची ओळख आहे. हा वाण राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात लावला जातो. उत्तर महाराष्ट्रात मात्र या जातीचे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे. या जातीबाबत बोलायचं झालं तर याचे बोंडाचे हे सहा ते आठ ग्रॅम एवढे भरते. 160 दिवसात या जातीचे कापूस पीक (Cotton Variety) परिपक्व होते. जिरायती आणि बागायती अशा दोन्ही परिस्थितीत त्याची लागवड होऊ शकते.

जर जिरायती भागात लागवड केली असेल आणि हलकी जमीन असेल तर सहा ते सात क्विंटल, मध्यम जमीन असल्यास आठ ते नऊ क्विंटल आणि भारी जमीन असल्यास दहा ते अकरा क्विंटल चे उत्पादन मिळू शकते. बागायती भागात लागवड केल्यास या जातीपासून 17 ते 18 क्विंटल एवढे विक्रमी उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे हवामान बदलास देखील ही जात चांगली आहे. म्हणजे जास्तीचा पाऊस पडला तरीही आणि कमी पाऊस असला तरीही या जातीपासून बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते. विशेष म्हणजे विविध कीटकास आणि रोगास देखील ही जात प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे.

रासी 659 : या जातीचे पीक 155 ते 160 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. हा वाण खालच्या जमिनीसाठी सर्वोत्कृष्ट आहे. मात्र काळ्या कसदार जमिनीत या जातीपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. कोरडवाहू भागात या जातीपासून चांगले उत्पादन मिळत आहे. या जातीचे पिक वेचणीला सोपे आहे.

रासी निओ : या जातीचे पीक 155 ते 165 दिवसात परिपक्व होते. या जातीचा कापूस हा 27 एमएम धागा असणारा आहे. म्हणजेच या कापसाचा मध्यम धागा असतो. हलक्या जमिनीसाठी योग्य आहे. बागायती भागात आणि भारी जमिनीत या जातीपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

अजित 155 : या जातीचे पीक 160 दिवसांत परिपक्व होते. हलक्या जमिनीत लागवड केली तरीसुद्धा बारा क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते. बागायती आणि जिरायती भागात लागवड केली जाऊ शकते. मात्र हा कापूस वेचणीस किचकट असल्याचे म्हटले जात आहे.

error: Content is protected !!