Cow Bird Flu : पहिल्यांदाच गायींमध्ये आढळलाय ‘हा’ आजार; पशुपालकालाही झालीये लागण!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबर 2019 मध्ये महाविनाशकारी कोरोना आजाराचा (Cow Bird Flu) उगम झाला होता. त्यानंतर अवघ्या विश्वाने या आजाराची धास्ती घेतली होती. अशातच आता अमेरिका या विकसित देशामध्ये गायीच्या माध्यमातून माणसाला ‘बर्ड फ्लू’ हा आजार झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती गायींसोबत नियमितपणे गोठ्यात काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने प्रथमच गायीच्या माध्यमातून मानवाला ‘बर्ड फ्लू’ हा आजार झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ‘बर्ड फ्लू’ या रोगाचा (Cow Bird Flu) हा विषाणू कोरोनापेक्षाही घातक असल्याचे अमेरिकी तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आजपर्यंतची पहिलीच घटना (Cow Bird Flu In Human First Time)

यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन अर्थात सीडीसीने आपल्या संकेतस्थळावर याबाबत माहिती जारी केली आहे. सीडीसीच्या अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेच्या टेक्सास या शहरात आढळलेल्या ‘बर्ड फ्लू’ व्हायरस संक्रमित रुग्णाला, गायींच्या माध्यमातून (Cow Bird Flu) त्याची लागण झाली आहे. हा व्यक्ती ज्या गोठ्यामध्ये काम करत होता. त्यातील गायींमध्ये हा आजार आढळून आला आहे. ज्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच ‘बर्ड फ्लू’ हा आजार गायींमध्ये आढळून आला आहे. यापूर्वी कोंबड्यांमध्ये देखील ‘बर्ड फ्लू’ हा आजार आढळून आला होता. कोंबड्यांमधील आणि सध्या या पशुपालकाच्या गोठ्यातील गायींमध्ये आढळून आलेला व्हायरस आणि त्याला लागण झालेल्या व्हायरसमध्ये पूर्णतः साम्य असल्याची पडताळणी करण्यात आली आहे. त्यानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. असेही अमेरिकेच्या सीडीसी या संस्थेने म्हटले आहे.

‘बर्ड फ्लू’बाबत अलर्ट जारी

आता कुठे जग कोरोनाच्या महामारीतून सावरत होते. अशातच आता अमेरिकेत गायींच्या माध्यमातून पशुपालक आणि त्यांच्या जनावरांमध्ये ‘बर्ड फ्लू’ हा रोग आढळून येत आहे. ज्यामुळे ‘बर्ड फ्लू’ अर्थात एवियन इन्फ्लूएंजा (एच5एन1) या आजाराबाबत अमेरिकेत अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय त्या ठिकाणी तज्ज्ञांनी पशुपालकांना त्यांच्या जनावरांसोबत शक्य तितका कमी संपर्क ठेवण्याचे आवाहन केले आहे. अशा पद्धतीने गायींच्या माध्यमातून ‘बर्ड फ्लू’ हा आजार होण्याची पहिलीच केस असल्याने सध्या अमेरिकेत याबाबत काहीसे धाकधुकीचे वातावरण असून, याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

error: Content is protected !!