Cow Breeds : ‘या’ तीन प्रजातीच्या गायींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होईल भरघोस वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकरी मोठ्या संख्येने दुग्ध व्यवसायात (Cow Breeds) उतरत आहे. शेतीतून मिळणाऱ्या अशाश्वत उत्पन्नामुळे अनेक शेतकऱ्यांचा ओढा डेअरी व्यवसायाकडे वाढला आहे. दूध दर कमी असले तरी जातिवंत गायींचे पालन केल्यास, त्यातून अधिक दूध उत्पादनामुळे निश्चितच अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. त्यामुळे आता तुम्ही देखील जातिवंत देशाची गायींचे पालन करण्याचा विचार करत असाल तर आज आपण मेवाती गाय, हल्लीकर गाय आणि सिरोही गाय या देशी गायींच्या तीन प्रजातींबद्दल (Cow Breeds) जाणून घेणार आहोत.

3 देशी गायींच्या प्रजाती? (Cow Breeds In India)

1. मेवाती गाय : मेवाती गाय (Cow Breeds) किंवा तिला कोसी गाय देखील म्हणतात. या गाईच्या प्रजातीचे नाव हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यावरून पडले आहे. या प्रजातीची गाय गीर गाय आणि हरियाणवी जातींच्या जवळची असल्याची मानली जाते. त्यामुळे तुम्ही मेवाती गायीच्या माध्यमातून दूध व्यवसाय करू शकतात. ही गाय बहुतांश पांढऱ्या रंगाची असते. आणि क्वचितच त्यावर तपकिरी छटा देखील आढळतात. या गायीची उंची ही 125.4 सेमी असते. ही गाय दररोज 5 ते 7 लीटर इतके दूध देते. अर्थात ही गाय एका वेताला सरासरी 900 ते 1000 लीटर दूध देते.

2. हल्लीकर गाय : हल्लीकर गाय (Cow Breeds) हा कर्नाटकात आढळणारा गोवंश असून, याच्या नर बैलाचा उपयोग शेती आणि कष्टाच्या कामासाठी केला जातो. या गायीची ओळख म्हणजे या गायीच्या डोळे आणि मानेवर पांढरे निशाण असते. या गायीची उंची ही साधारणपणे 124.75 सेमी इतकी असते. या गायीचा चेहरा लांब, आणि नाकाकडे झुकलेला असतो. या गायीचे नाक काळ्या किंवा भुरकट रंगाचे असते. याशिवाय या गायीचे शिंगे ही लांब आणि डोक्यावर एक-दुसऱ्यांकडे वळलेले असतात. ही आपले वेत हे 37 महिन्यांचे वय पूर्ण झाल्यानंतर देते. हल्लीकर गाय ही आपल्या एका वेताला सरासरी 542 लिटरपर्यंत दूध देते. तर दररोज ही गाय 4 ते 5 लीटर दूध देते.

3. सिरोही गाय : सिरोही गाय ही नारी गाय म्हणूनही ओळखली जाते. तिचे मूळस्थान गुजरात राज्यातील बनासकांठा व साबरकांठा जिल्ह्यातील आहे. या गायीची उंची ही साधारणपणे 120.9 सेमी इतकी असते. या गायीचा रंग अधिकांश बाबतीत सफेद किंवा भुरकट असतो. या गायीची विशेषतः म्हणजे ती एका आपल्या एका वेताला सरासरी 1647 लीटर दूध देते. या गायीच्या दुधामध्ये 4.64 टक्के फॅट असतो. तसेच ती दररोज 10 ते 12 लीटर इतके दूध देते.

error: Content is protected !!