Cow Breeds : ‘लाल कंधारी गाय’ देशी वंशाची गाय; वाचा…वैशिष्ट्ये, किती देते दूध?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात अनेक देशी गोवंश (Cow Breeds) आढळतात. त्यामध्ये देवणी, गीर, खिलार, कपिला, लाल कंधारी, साहिवाल, थारपारकर, राठी, लाल सिंधी, डांगी अशा गोवंशाचा सामावेश आहे. पण लाल कंधारी हा देशी गोवंश मराठवाड्यातील कंधार या भागात आढळतो. या गाईचे मराठवाडा भागात विशेष महत्त्व आहे. लाल कंधारी गाय देशी वंश असून, नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हिची निर्मिती झालेली आहे. ही गाय संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. या जातीची गायीची (Cow Breeds) दूध देण्याची क्षमता सामान्य असून, शेतीकामासाठी तिचा बैल उपयुक्त असतो.

काय आहेत ‘या’ गाईचे वैशिष्ट्ये? (Cow Breeds In India)

ही गाय प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी वापरली जाते. या जातीचे बैल चपळ व ओढकामासाठी वापरले जातात. कोरड्या हवामानात आणि दुष्काळसदृश्य वातावरणात या जातीच्या गाईंची (Cow Breeds) वाढ चांगल्या प्रकारे होते. या गाईंच्या दुधातील स्निग्धांश हा 3 ते 4.5 पर्यंत असतो. या गोवंशातील बैलांचा शेतीकामासाठी, वाहतुकीसाठी आणि बैलगाडा शर्यतीसाठी वापर केला जातो.

शारिरीक वैशिष्ट्ये

ही गाय संपूर्ण लाल रंगाची असून मस्तक मध्यम आकाराचे असतात. डोळे लांबट व काळे वशिंड असते. वशिंड आकर्षक असून जसे वय वाढेल तसा वशिंडाचा रंग काळसर होत जातो. कासेचा आकार गोलाकार आणि गुलाबी रंगाची चमकदार कातडी कासेला असते.

दुग्ध उत्पादन क्षमता

लाल कंधारी गाईंच्या एका वेताचे सरासरी दूध उत्पादन हे 650 ते 1100 किलो एवढे असते. खाद्याच्या नियोजनानुसार दुधाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. दूध उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या गाईंच्या यादीत लाल कंधारी गोवंशाचा सामावेश होतो.

error: Content is protected !!