Cow Breeds : दुधाचा धंदा करायचाय? ‘या’ जातीची गाय ठरेल वरदान; देते दररोज 60 लिटर दूध!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या पशुपालन व्यवसाय (Cow Breeds) हा हायटेक होऊ लागला आहे. अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये पाऊल ठेवत असून, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. अधिक करून पशुपालन व्यवसायामध्ये म्हैसपालन आणि गाईंचे पालन केले जाते. या माध्यमातून दूध उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे बरेच शेतकरी जातिवंत गाई (Cow Breeds) व म्हशी घेण्याकडे कल असतो.

हरधेनू गाय (Cow Breeds For Dairy Farmers)

यात प्रामुख्याने गाईंच्या जातींचा (Cow Breeds) विचार केला तर यामध्ये देशी आणि संकरित या दोन प्रकारच्या गाई असतात.बहुतेक शेतकरी जर्सी, एचएफ अर्थात होल्स्टिन फ्रिजियन या प्रकारच्या जातींचे पालन करतात. त्यासोबतच देशी गाई मध्ये देखील गिर, लाल कंधारी यासारख्या जाती खूप महत्त्वपूर्ण आहेत. पण वाढीव उत्पादनासाठी अशीच एक गाईची जात आहे. जी खूप महत्त्वपूर्ण असून, या गाईपासून मिळणारे दुधाचे उत्पादन देखील जास्त असते व या गाईचे नाव आहे हरधेनू गाय हे होय. आज आपण गायीच्या या जातीबद्दल जाणून घेणार आहोत.

तीन गायींचा एकत्रित संकर

हरधेनू गाईचा विचार केला तर हरियाणाच्या लाला लजपतराय युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी अँड अनिमल सायन्सेस येथील शास्त्रज्ञांनी तीन गाईंच्या जातींचे एकत्रित संकर करून ही गाय तयार केली आहे. तज्ञांच्या मते ही जात होल्स्टिन फ्रिजीयन, स्थानिक हरियाणवी आणि साहिवाल जातीच्या संकरित जाती पासून तयार करण्यात आली आहे.

दररोज 55 ते 60 लिटर दूध देण्याची क्षमता

हरधेनू गाईचा विचार केला तर या जातीच्या गाईची दूध देण्याची क्षमता इतर जातींच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. या गाईपासून मिळणारे दुधाचा रंग हा इतर गाईच्या दुधापेक्षा जास्त पांढरा असतो. तसेच जर आपण इतर गाईंच्या दूध देण्याची क्षमता याचा विचार केला तर दिवसाला सरासरी पाच ते सहा लिटर दूध देतात. परंतु हरधेनू गाय दिवसाला पंधरा ते सोळा लिटरपर्यंत दूध देते. या गाईचे आहार व्यवस्थापन वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर एका दिवसात 55 ते 60 लिटर दूध ही गाय देऊ शकते.

error: Content is protected !!