Cow Disease : 6 वर्षात लाळ्या खुरकूत रोग समूळ नष्ट करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांच्या लाळ्या खुरकूत रोगाबद्दल (Cow Disease) डेअरी उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वच शेतकरी चांगलेच परिचित आहे. या जीवघेण्या रोगाबाबत आता खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वच शेतकऱ्यांना नुकसानदायी ठरणार हा रोग, पुढील 6 वर्षांत अर्थात 2030 पर्यंत समूळ नष्ट केला जाईल. या रोगावरील लसीकरण प्रक्रिया देशभरात वेगाने राबवली जात असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यात लवकरच यश मिळेल. असे त्यांनी म्हटले आहे. बिहारच्या जमुई जिल्ह्यात गुरुवारी (ता.5) आयोजित जाहीर सभेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

15,000 कोटींची तरतूद (Cow Disease Foot Mouth Disease)

मानव सेवेप्रमाणेच देशातील पशुधनाचे संरक्षण हे देशातील भाजप सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. ज्यामुळे सरकारने जनावरांचे आजार समूळ नष्ट करण्याचा संकल्प केला असून, देशभरात मोफत लसीकरण राबवले जात आहे. देशभरात जवळपास 15,000 कोटी रुपये खर्चून लाळ्या खुरकूत रोगाचे (Cow Disease) उच्चाटन करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरु आहेत. त्यात पुढील सहा वर्षांमध्ये अर्थात 2030 पर्यंत पूर्णपणे यश मिळण्याची शक्यता आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

24 कोटी जनावरांना लसीकरण

केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धविकास विभागाच्या आकडेवारीनुसार, देशभरात लाळ्या खुरकूत रोगावरील लसीकरण अभियान वेगाने सुरु आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात मार्च 2024 पर्यंत देशभरातील 24 कोटी जनावरांना (गाय, म्हैस) या रोगाचे लसीकरण करण्यात आले आहे. अर्थात दुसऱ्या टप्प्यातील आतापर्यंत 95 टक्के लक्ष्य पूर्ण करण्यात केंद्राला यश मिळाले आहे. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमुई जिल्ह्यात सभेला संबोधित करताना पशुधनाची रक्षा करण्याचा संकल्प केला आहे.

काय आहे लाळ्या खुरकूत रोग?

लाळ्या खुरकूत रोग हा जनावरांना होणारा जीवघेणा रोग आहे. या रोगामुळे जनावरांच्या तोंडाची कातडी निघते. ज्यामुळे जनावर चारा खाणे कमी करते. शिवाय जनावर पाणी देखील कमी पिते. तर पायांच्या खुरांना देखील या रोगामुळे संक्रमण झालेले असते. परिणामी, अशा जनावराची दूध देण्याची क्षमता खूपच मंदावते. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो.

error: Content is protected !!