Cow Dung Business : ‘या’ शेतकऱ्यानं खरंच शेण विकून तब्बल 1 कोटींचा बंगला बांधलाय? काय आहे गोधन निवासचं गणित जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Cow Dung Business : भारतामध्ये अनेक शेतकरी शेती सोबत जोड व्यवसाय म्हणून पशुपालन हा व्यवसाय करत आहेत. अनेक शेतकऱ्यांची उपजीविका या व्यवसायावर अवलंबून आहे. अनेकजण दूध व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर पशुपालनासंबंधित इतर व्यवसायातून पैसे कमवत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे दूध, दही, पनीर असे मोठे व्यवसाय देखील आहेत. दुग्धजन्य उत्पादन विक्रीतून अनेक जण चांगले पैसे कमवत असल्याचे दिसत आहेत. मात्र मागील काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने शेण विकून तब्बल १ कोटी रुपयांचा बंगला बांधल्याच्या बातम्या आपण पहिल्या असतील. या शेतकऱ्याने खरंच शेण विकून इतके पैसे कमावले का? नक्की या शेतकऱ्याचं आर्थिक गणित काय आहे? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

शेती डोक्याने आणि गणित मांडून केली तर नक्कीच फायद्यात

शेतकरी मित्रांनो आपला चांगला बंगला असावा, दारात चारचाकी गाडी असावी असं स्वप्न अनेकजण पाहत असतात. आपण स्वप्न पाहायलाच हवीत कारण स्वप्न पहिली तरच ती पूर्ण करण्यासाठी आपण झपाटून काम करतो. अन तुम्हाला आम्ही सांगतो कि शेतीमध्ये तुमची सर्व स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आहे. शेती जर डोक्याने आणि गणित मांडून केली तर नक्कीच शेती फायद्यात तर राहतेच मात्र यातून मोठा नफा देखील कमावता येतो. सोलापूरच्या प्रकाश नेमाडे यांनी देखील व्यवसायाचं गणित मांडून शेती केली आहे अन कोट्यवधींचा बंगला बांधला आहे.

तुमचा कोणताही व्यवसाय असेल तर ‘या’ अँप वरून करा मोफत जाहीरात

तुम्ही कोणताही शेतीनिगडीत व्यवसाय करत असाल तर हे मोबाईल अँप तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. तुमची खताचे दुकान असो वा रोपवाटिका तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या. या अँपवर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची मोफत जाहिरात करता येते तसेच थेट ग्राहक शेतकऱ्याला तुम्ही तुमची वस्तू वा सेवा ऑनलाईन विकू शकता. यामध्ये तुमच्याकडे एखादे वाहन भाड्याने असेल, किंवा तुम्ही मजूर, वायरमन असाल तर हे अँप डाउनलोड करा. यामधली शेतकरी दुकान मध्ये अनेकी सुविधा देण्यात आल्या आहेत.

कोण आहे कोट्यवधींचा बंगला बांधणारा शेतकरी?

सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दूध आणि शेण विक्रीतून कोट्यावधींचा बंगला बांधला आहे. प्रकाश नेमाडे असं या शेतकऱ्याचे नाव आहे. हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी आहेत. सांगोला हा तसा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. मात्र त्यांच्या मेहनतीने त्यांनी स्वतःचे नाव काढले आहे. दूध आणि गाईच्या शेण विक्रीतून त्यांनी चांगले पैसे कमावले आहेत.

गायीचे दूध आणि शेण विक्री करून कमावले करोडो

माहितीनुसार, प्रकाश नेमाडे यांनी गायीचे दूध आणि शेण विक्री केली त्यातून त्यांना चांगला नफा देखील मिळाला आणि त्यांनी त्यांच्या शिवारामध्ये जवळपास एक कोटी रुपयांचा बंगला बांधला आहे. गोधन असं नाव त्यांनी या बंगल्याला दिले आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती देखील आहे मात्र त्यांच्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे म्हणावे तसे पीक शेतात येत नाही. त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांनी पशुपालन व्यवसायाला प्राधान्य दिले त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेतला असून सध्या ते यातून चांगला नफा कमवत आहेत.

गोबर गॅस प्लॉट

प्रकाश नेमाडे यांनी त्यांच्या गाईचे शेण विक्रीतून एक कोटी रुपयांचा उद्योग उभा केला आहे. सेंद्रिय शेतीवर त्यांचा विश्वास असून त्यांनी गोबर गॅस प्लॉट पण टाकला आहे. त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळत आहे. त्यांनी गाईच्या विक्रीतून आतापर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

गोठ्यामध्ये आहेत 150 गाई

सुरुवातीला ज्यावेळेस त्यांनी दूध व्यवसाय करायचे ठरवले त्यावेळी त्यांच्याकडे फक्त एकच गाय होती. सुरुवातीला घरोघरी जाऊन दूध विकायचे त्यानंतर त्यांनी त्यांच्या मेहनतीने पशुपालन व्यवसायात मोठा पल्ला गाठला आणि साम्राज्य उभं केलं. आज जर पाहिले तर त्यांच्याकडे जवळपास 150 गाई आहेत आता ते एक स्मार्ट उद्योग उद्योजक झाले आहेत. त्यांनी दुधासोबतच शेण विक्रीचा पण व्यवसाय सुरू केल्याने त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.

error: Content is protected !!