Cow Milk Increase : ‘हे’ तीन घरगुती उपाय करा; दूध उत्पादनात होईल मोठी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या हळूहळू वातावरणात बदल होऊन तप्त उन्हाची (Cow Milk Increase) चाहूल लागत आहे. येत्या महिनाभरात वातावरणात पूर्णपणे बदल होऊन उन्हाळा सुरु होईल. ज्याचा दुधाळ जनावरांवर मोठा परिणाम होऊन, दूध उत्पादनात मोठी घट होते. मात्र आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नसून, तुम्ही घरच्या घरी दुधाळ जनावराच्या दूध वाढीसाठी काही उपाय करू शकतात. जे तुम्हाला उन्हाळ्यात दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी मोठी मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया हे दूध वाढीचे (Cow Milk Increase) घरगुती उपाय काय आहेत.

चवळीचा पाला अतिशय उपयुक्त (Cow Milk Increase Tips For Farmers)

दूध उत्पादक शेतकरी हे जनावरांच्या दुधाचे उत्पादन वाढीसाठी (Cow Milk Increase) बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक प्रकारच्या कंपन्यांच्या पावडरी व दूध वाढीसाठी इंजेक्शन वापर करतात. ज्याचा वापर करून दुभत्या जनावरांचे दूध काही प्रमाणात वाढते. मात्र त्याचा जनावराच्या आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय अशा जनावरापासून मिळालेले दूध हे मानवी आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे घरगुती पद्धतीने जनावरांच्या आहारावर विशेष लक्ष देण्याची खूप गरज असते. अशावेळी तुम्ही दुधाळ जनावरांच्या आहारात लोबिया अर्थात चवळीच्या पाल्याचा समावेश करू शकता. चवळीच्या पाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टीक घटक असल्याने, दूध उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होते.

महत्वाचे घरगुती उपाय

गाय, म्हशीच्या दूध वाढीसाठी घरगुती उपाय करण्यासाठी एका वेळी 250 ग्रॅम गव्हाचे पीठ, 50 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम गुळ, एक कच्चे खोबरे, 25-25 ग्रॅम जिरे या गोष्टींची तुम्हाला आवश्यकता असणार आहे. यासाठी गहू पीठ, मेथी, जिरे आणि गूळ चांगला शिजवून घ्या. नंतर खोबरे बारीक करून त्यात टाकावे. ते थंड झाल्यावर जनावरांना खायला द्यावे. सकाळी रिकाम्या पोटी जनावरांना उन्हाळयात 2 महिने खायला द्यावे. हे शक्य नसल्यास तुम्ही दररोज गायीला गव्हाच्या पिठाचा केवळ गोळा देखील देऊ शकतात. याशिवाय मोहरीचे तेल आणि गव्हाच्या पिठापासून दूध वाढवण्यासाठी, तुम्ही दररोज 200 ते 300 ग्रॅम मोहरीचे तेल, 250 ग्रॅम गव्हाचे पीठ असलेला गोळा देण्याचा उपाय देखील करू करतात. मात्र हा गोळा दिल्यानंतर लगेचच जनावराला पाणी पाजू नये, अन्यथा खोकला उद्भवू शकतो. या तीन पैकी कोणताही एक जो शक्य असेल तो करून पहा, नक्कीच दूध उत्पादनात वाढ दिसून येईल.

error: Content is protected !!