Cows For Farmers : ‘या’ जिल्ह्यात होणार दोन हजार गाईंचे वाटप; पहा… कोणाला मिळणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय (Cows For Farmers) करण्याची इच्छा असते. मात्र, त्यांना भांडवलाअभावी गाई खरेदी करून, दूध व्यवसाय सुरु करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने शेतकऱ्यांची हीच कमजोर बाजू लक्षात घेऊन शेतकऱ्यांना, दोन हजार गाईंचे वाटप करण्याचे निश्चित केले आहे. प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना या गाईंचे वाटप (Cows For Farmers) केले जाणार आहे. अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

याशिवाय आदिवासी नंदुरबार जिल्ह्यात आमचूरचा प्रक्रिया उद्योग (Cows For Farmers) उभारण्यासाठी सव्वा आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. नंदुरबार जिल्ह्यात ४२ बचत गटांना शेळी वाटप, व ग्रामीण भागातील ८८१ महिलांना गॅस जोडणीचे वाटप करण्यात आले. याशिवाय १०३ वनपट्टेधारकांना प्रत्येकी १० शेळी, बोकड वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली आहे.

रोजगार उपलब्ध होणार (Cows For Farmers In Nandurbar)

याशिवाय आगामी काळात आदिवासी शेतकऱ्यांना या २ हजार गायीचे वाटप केल्याने दुर्गम भागात शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच आदिवासी शेतकऱ्यांना शेतीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कमी असून, त्यांना दूध व्यवसायाची जोड मिळाल्यास त्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

3 हजार महिलांना प्रशिक्षण

इतकेच नाही तर जिल्ह्यात धडगाव-अक्कलकुवा तालुक्यात आमचूरचा प्रक्रिया उद्योग सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३ हजार महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यातील वितरण करण्यात आले असून, प्रकल्पासाठी आणखी सव्वा आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी महिलांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!