Crime News शेतातून लाखो रुपयांचे आले गेले चोरीला; शेतकऱ्यांनी बसविले शेतात CCTV

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Crime News : सध्या टोमॅटोच्या दराने उचांकी गाठली आहे. त्यामुळे टोमॅटो चोरीच्या घटना देखील मागच्या काही दिवसापासून समोर येत आहेत. टोमॅटोनंतर अनेक पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. महागाई वाढल्याने शेतातून हिरव्या भाज्यांची चोरी सुरू झाली आहे. टोमॅटोपाठोपाठ आता आल्याची चोरी झाल्याच्या देखील घटना समोर आल्या आहेत.

आल्याचे अचानक भाव वाढले आहेत त्यामुळे मागच्या काही दिवसापासून आले चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत आता शेतकरी आपले पीक चोरांपासून वाचवण्यासाठी आपल्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहेत. (Crime News)

सध्या देखील कर्नाटकमध्ये आले चोरीला गेल्याचे ताजे प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी चोर अंधार पडताच आले चोरायला निघतात. शेतात शेतकरी नसेल, तर हे चोरटे आले पिक चोरून नेतात. विशेष म्हणजे कर्नाटकात आल्यावर आले पिकाची लागवड करणाऱ्या केरळमधील शेतकऱ्यांच्या शेतात चोरटे जास्त चोरी करत आहेत. अशा स्थितीत केरळमधील अनेक शेतकऱ्यांनी आले चोरीबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.

तेथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून आले उत्पादकांना खूप तोटा सहन करावा लागत होता कारण आल्याला भाव मिळत नव्हता. परंतु, यावेळी भाव वाढल्याने चोरट्यांनी शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या चोरीच्या घटनांपासून आले पीक वाचविण्यासाठी शेतकरी शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!