Crop Advisory: शेतकर्‍यांसाठी हवामान आधारित साप्ताहिक कृषी सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात (Crop Advisory) काही ठिकाणी तुरळक पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.  यावेळी शेतकऱ्यांना करायची शेतातील कामे जाणून घ्या कृषी तज्ज्ञांमार्फत (Crop Advisory) .

शेत पिकांचे व्यवस्थापन (Crop Advisory)

  • वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या करडई पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी.
  • कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे ऊस पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावत ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20% 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. दिनांक 19 मार्च रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता, काढणी केलेल्या हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
  • वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पध्दतीने करावे.
  • उन्हाळी भुईमुग व सुर्यफुल पिकात आंतरमशागतीची कामे करावीत. उन्हाळी तीळ पिकाला पेरणीनंतर 30 दिवसांनी नत्र खताचा उरलेला हप्ता द्यावा.
  • उन्हाळी भुईमुग पिकावरील तांबेरा आणि टिक्का रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी टेबूकोनोझोल 25% डब्ल्यू. जी. 500 ते 750 ग्रॅम प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  

भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन (Crop Advisory)

  • काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
  • कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे, उन्हाळी भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
  • सध्याच्या उष्ण वातावरणामूळे मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • कांदा व लसूण पिकावर फुलकिडे करपा रोग आढळताच क्विनॉलफॉंस 25% प्रवाही @ 12 मिली + मॅन्कोझेब @ 25 ग्रॅम + सन्डोव्हीट स्टीकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी च्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोयट 5% @ 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

फळबाग व्यवस्थापन (Crop Advisory)

  • आंबा बागेमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम 46.27% एससी @ 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
  • काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून घ्यावी.
  • कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे, संत्रा/मोसंबी संत्रा/मोसंबी, डाळिंब व चिकू बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
  • जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी, डाळिंब व चिकू फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
  • नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
error: Content is protected !!