Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीपोटी सरकारकडून 107 कोटींचा निधी मंजूर; वाचा जीआर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात 2020 ते 2022 या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे (Crop Damage) कोकण, नागपूर, नाशिक, पुणे, अमरावती आणि संभाजीनगर या सहाही विभागांमध्ये शेती पिकांचे तसेच शेतकऱ्यांच्या अन्य गोष्टींचे मोठे नुकसान झालेले होते. त्यानुसार वेळोवेळी संबंधित विभागांच्या विभागीय आयुक्तांकडून मदत निधीच्या मागणीसाठीचे पत्र सादर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा जीआर राज्य सरकारकडून (Crop Damage) जारी करण्यात आला आहे.

कोरोना काळातील नुकसानीसाठी मदत (Crop Damage 107 Crores Sanctioned)

2019 मध्ये कोरोना काळातील दोन ते तीन वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या काळात या निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव सरकारकडून या मदत निधीच्या प्रस्तावावर कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोना काळातील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानीबाबत (Crop Damage) आवश्यक मदतीचे प्रस्ताव नव्याने पाठवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. त्यानुसार प्राप्त आदेशानुसार कोरोना काळात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या आणि इतर बाबींच्या नुकसानीपोटी हा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी

वर्ष 2020 ते 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या मदतीबाबत त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी व नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांकडून वारंवार मागणी केली जात होती. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित होते. शेतकरी आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या प्रस्तावांना राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, त्यापोटी 107 कोटींचा निधी मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याने, कोरोना काळात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या काळात मदतनिधीची मागणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी वाचा जीआर : (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402211316135519.pdf)

error: Content is protected !!