Crop Insurance : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपयांचा अग्रीम पीक विमा वितरित होणार- कृषी मंत्री धनंजय मुंडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील पीक विमा (Crop Insurance) कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे.

खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये (Crop Insurance) राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

अग्रीमबाबत समस्या तातडीने सोडविण्यासंदर्भात मंत्री श्री.मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत आग्रही होते. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना मंत्री श्री.मुंडे यांनी केल्या आहेत.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही कोणत्याही सरकारी अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या कोणत्याही सरकारी योजनांना अर्ज करून थेट लाभ घेऊ शकता. याशिवाय, तुम्हाला यामध्ये सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, रोजचा बाजारभाव, पशु खरेदी -विक्री यांसारख्या असंख्या सुविधा अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि सर्व सुविधांचा लाभ घ्या

कोणत्या जिल्ह्यासाठी किती कोटींची मंजुरी– Crop Insurance

नाशिक – शेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (रक्कम – 155.74 कोटी)

जळगाव – लाभार्थी शेतकरी 16,921 (रक्कम – 4 कोटी 88 लाख)

अहमदनगर – लाभार्थी शेतकरी 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख)

सोलापूर – लाभार्थी शेतकरी 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)

सातारा – लाभार्थी शेतकरी 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)

सांगली – लाभार्थी शेतकरी 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)

बीड – लाभार्थी शेतकरी 7,70,574 (रक्कम – 241 कोटी 21 लाख)

बुलडाणा – लाभार्थी शेतकरी 36,358 (रक्कम – 18 कोटी 39 लाख)

धाराशिव – लाभार्थी शेतकरी 4,98,720 (रक्कम – 218 कोटी 85 लाख)

अकोला – लाभार्थी शेतकरी 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)

कोल्हापूर – लाभार्थी शेतकरी 228 (रक्कम – 13 लाख)

जालना – लाभार्थी शेतकरी 3,70,625 (रक्कम – 160 कोटी 48 लाख)

परभणी – लाभार्थी शेतकरी 4,41,970 (रक्कम – 206 कोटी 11 लाख)

नागपूर – लाभार्थी शेतकरी 63,422 (रक्कम – 52 कोटी 21 लाख)

लातूर – लाभार्थी शेतकरी 2,19,535 (रक्कम – 244 कोटी 87 लाख)

अमरावती – लाभार्थी शेतकरी 10,265 (रक्कम – 8 लाख)

एकूण – लाभार्थी शेतकरी 35,08,303 (मंजूर रक्कम – 1700 कोटी 73 लाख)

error: Content is protected !!