Crop Insurance Scheme : ‘या’ जिल्ह्यातील तब्बल 3 लाख शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज फेटाळले!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नैसर्गिक संकटाच्या काळात पिकांना संरक्षण कवच (Crop Insurance Scheme) आणि शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळावी; यासाठी पीकविमा योजना सुरु झाली आहे. परंतु विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ उशिराने मिळत असतो. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 3 लाखांवर शेतकऱ्यांचे पीक विमा (Crop Insurance Scheme) अर्ज कंपनीकडून फेटाळण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीच लागणार नसल्याचे चित्र आहे.

6 लाख शेतकऱ्यांचे अर्ज (Crop Insurance Scheme)

पावसाचा लहरीपणा तसेच बदलणाऱ्या वातावरणाचा फटका पिकांना बसत असतो. यामुळे एक रुपयात पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळत असते. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यातील 6 लाख 10 शेतकऱ्यांनी पाचशे कोटी रुपयांचा पिक विमा उतरविला आहे. यात काही शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्याने कंपनीकडे अर्ज सादर केले आहेत.

निम्म्या शेतकऱ्यांचे अर्ज फेटाळले

प्रत्यक्षात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक प्रकोपाने हल्ला चढविला असताना या काळात विमा उतरविण्याचा प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळवण्यासाठी मोठी अपेक्षा होती. मात्र विमा कंपनीने त्यांची पार निराशा केली. 6 लाख 10 शेतकऱ्यांनी पिकांच्या (Crop Insurance Scheme) नुकसानासाठी अर्ज दाखल केले. यातील 3 लाख 10 हजार शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीने फेटाळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा कंपनीने एक प्रकारे मोठा झटका दिला आहे.

पीक विमा योजना?

शेती करणे तितकेसे सोपे काम नाहीये. कधी दुष्काळ, अवर्षणाची स्थिती असते. कधी ओला दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस पडतो. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजना राबविली जात आहे. यामध्ये शेतकरी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील पिकांचा विमा भरू शकतात. या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते.

error: Content is protected !!