Crop Loan Subsidy Scheme: डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना; जाणून घ्या संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी हा कोणत्याही (Crop Loan Subsidy Scheme) देशाचा किंवा राज्याचा आधार असतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना (Dr.Panjabrao Deshmukh Crop Loan Subsidy Scheme) ही पीक उत्पादन प्रोत्साहन योजना (Crop Loan Subsidy Scheme) राज्यात अमलात आणलेली आहे.

या योजनेनुसार त्रिस्तरीय सहकारी पतसंस्थेने कडून रुपये 3 लाखापर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000/- र पर्यंतच्या कर्जावर 4 टक्के व्याज सवलत व त्यापुढील रुपये 3 लाखांपर्यंतच्या कर्जावर 2 टक्के व्याज सवलत देण्यात येते. तथापि रुपये तीन लाखापर्यंत अल्प मुदत कर्जाची नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने व्याज सवलतीचा दर वर्ष 2011-12 पासून 2 टक्के ऐवजी 3 टक्के करण्याचे योजले आहे. शेतकरी शेतीसाठी घेत असलेल्या पीक कर्जासाठी 3% पर्यंत अनुदान मिळू शकेल.

योजनेसाठी लाभार्थी पात्रता (Eligibility for the Scheme)

  • योजनेचे मुख्य लाभार्थी शेतकरी आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी असे कोणतेही विशेष निकष नाहीत. कोणत्याही उत्पन्न गटातील कोणतेही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • तसेच महाराष्ट्रातील नागरिक असलेले शेतकरी या योजनेस पात्र ठरणार आहेत.
  • या योजनेसाठी जात, धर्म, लिंग किंवा उत्पन्नाची मर्यादा यासारखे बंधनकारक नाही.
  • ज्या शेतकर्‍याकडे जमीन आहे किंवा त्यांचे मालक नाही असा शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

योजनेची वैशिष्टे (Features of the scheme)

कर्ज / मूळ रक्कम प्रत्येक वर्षाच्या 30 जूनपर्यंत भरणे आवश्यक आहे. जर शेतकरी वेळेवर कर्ज फेडण्यात अयशस्वी झाला तर अनुदान काढून टाकता येईल. हे योजनेच्या अटी व नियमांवर अवलंबून आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सरकार अर्थसहाय्य देते. या योजनेत केंद्र सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. ही योजना केवळ राज्यातील ग्रामीण भागातच लागू आहे.

योजनेचे फायदे (Crop Loan Subsidy Scheme)

  • कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी निविष्ठा जसे की खत, बियाणे, औषधे इत्यादी खरेदी करता येणार आहे. त्यातून शेती उत्पादनात नक्कीच वाढ होणार आहे.
  • व्याजात सवलत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
  • या निर्णयामुळे कर्ज होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण देखील नक्कीच कमी होणार आहे.
  • या व्याज अनुदानामुळे आता शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होईल आणि ते वेळेवर सहजतेने रक्कम परतफेड करू शकतील (Crop Loan Subsidy Scheme).
error: Content is protected !!