Crop Management : यंदा पाऊस कमी झाल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण; रब्बीत असे करा चारा पिक नियोजन व लागवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Crop Management : राज्याच्या काही भागात पावसाभावी किंवा पावसाचे प्रमाण कमी असलेने दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचे वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे. आपल्याकडील जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याचे पूर्व नियोजन केल्यास जनावरांना वर्षभर पुरेसा हिरवा व वाळलेला चारा तसेच एकदल व द्विदल चारा पुरविता येईल. वर्षभर जनावरांना सकस चारा पुरविण्यासाठी खालिलप्रमाणे हंगामानुसार चारा लागवड करावी.

एकदल चारा पिक

मका –

या पिकाची वाढ उष्ण व कोरड्या हवामानात चांगली होते. हलक्या जमिनीत पिकाची वाढ समाधानकारक होत नाही. त्यामुळे मका या पिकासाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक खोल नागरट, दोन कुळवाच्या पाळया द्याव्यात. पेरणी खरीप हंगामात जून जुलै, रब्बी हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर उन्हाळी हंगामात फेब्रुवारी-मार्च या महिन्यात पाभरीच्या सहाय्याने दोन ओळीत ३० सें. मी. अंतर ठेऊन पेरणी करावी, बियाणे- मका लागवडी करता हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते.

सुधारित वाण:- मका या पिकाच्या अफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझीट, विजय, गंगा सफेद-२ हे वाण चा-यासाठी चांगले आहेत. नांगरण्यापूर्वी ५ टन शेणखत, पेरणीच्या वेळी ५० कि. नत्र, ५० कि. स्पू. ५० कि. पालाश व पेरणी नंतर ३-४ आठवड्यांनी ५० कि. नत्र द्यावे. कापणी पेरणी नंतर ६५-७० दिवसांनी पिक ५० टक्के फुलो-यात आले असता कापणी करावी.. उत्पन्न- एक हेक्टर मका क्षेत्रापासुन ५००-६०० क्विंटल चारा उपलब्ध होतो. प्रथिने या चारा पिकामध्ये ९ ते ११ टक्के प्रथिने असतात.

ज्वारी (कडवळ)

या पिकासाठी पोषक असे उष्ण व कोरडे हवामान आवश्यक आहे. काळी कसदार पण योग्य निचरा होणारी जमीन ज्वारी पिकास जास्त लाभदायक ठरते. चा-याचे पिक म्हणुन तीनही हंगामात ज्वारीची पेरणी करता येते. दोन ओळीतील अंतर २५-३० सें.मी. ठेवून पाभरीने ५ ते ७ सेमी. खोलवर पेरावे.

बियाणे : ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे आवश्यक आहे.
सुधारित वाण:- मालदांडी ३५-१, रुचिरा, फुले अमृता, फुले गोधन कापणी:- पिक फुलो-यात आले असता (पेरणीनंतर ६५-७० दिवसांनी) कापणी करावी. कोवळ्या ज्वारीमध्ये भूरिन नावाचे रसायन असते. जनावरांच्या पोटात त्याचे रूपांतर हैड्रोसायनिक आम्लामध्ये होते व त्यामुळे जनावरांना फेपरे येने, पोट फुगने, जनावर अस्वस्थ होणे असे अपाय होऊन ते दगाऊ शकते. म्हणून याविषयी दक्षता घ्यावी.
उत्पादन: हेक्टरी ५००-५५० क्विटल हिरव्या चा-याचे उत्पादन मिळते. प्रथिने या चारा पिकामध्ये ८ ते १० टक्के प्रथिने असतात.

संकरित नेपिअर –

या पिकास कसदार, मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. एक खोल नांगरट, तीन ते चार कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशित करावी.

सुधारित वाण – यशवंत, फुले जयवंत (आर. बी. एन. १३). फुले गुणवंत (आर. बी. एन. २०११-१२) बियाणे एकाजागी दोन ठोंब लावल्यास ३७ हजार ठोंब प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे लागते. एकाजागी एक ठोंब लावल्यास १८,५०० ठोंब प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे लागते.
पेरणी :- ९० X ६० सेंमी अंतरावर खरीप हंगामासाठी जुन ते ऑगस्ट व उन्हाळी हंगामासाठी फेब्रुवारी- मार्च महिन्यामध्ये पेरणी करावी
खते :– प्रतिहेक्टरी २० ते २५ गाडया शेणखत, ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश प्रतिहेक्टरी पेरणीपुर्वी व प्रत्येक कापणीनंतर २५ किलो नत्र द्यावे. ११ ते १२ आठवडयांनी पहिली कापणी व नंतरच्या कापण्या प्रत्येक ७ ते ८ आठवडयांनी कराव्यात.

उत्पादन :- ६ ते ७ कापण्यामध्ये फुले जयवंत १००० ते १५०० क्विंटल / हेक्टरी आणि फुले गुणवंत चे १२०० ते १५०० क्विटल/ हेक्टरी इतके उत्पादन मिळते.

प्रथिने – या चारा पिकामध्ये ८ ते १० टक्के प्रथिने असतात

मारवेल

मारवेल हे गवत वर्गीय चारा पिक आहे. ते जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे ते शेताच्या बांधावर देखील लावता येते. तसेच हे पिक काही काळ पाण्याशिवायही तग धरु शकते. मारवेल गवताची एकदा लागण केल्यास उत्तम व्यवस्थापनात सलग ४ ते ५ वर्षे उत्पादन घेता येते. जमीन मध्यम ते भारी
हवामान उष्ण व दमट मानवते.

बियाणे – मारवेलची लागण करण्यासाठी एकरी १५-२० हजार ठोंब लागतात. ओळीत पेरणी
करण्यासाठी हेक्टरी ६ किलो बियाणे लागते.
लागण :- या पिकाची नविन लागण जुन जुलै महिन्यात केली जाते. लागण करताना ठोंब – ४५ x ३० से. मी. अंतरावर लावावेत.
सुधारित वाण:- जिरायत: फुले मारवेल ०६-४०, फुले मारवेल -१
बागायत: फुले गोवर्धन

कापणी :– जिरायत मध्ये किमान २ कापण्या व बागायत क्षेत्रात एका वर्षामध्ये ६-८ कापण्या करता येतात. जिरायत पध्दतीमध्ये मारवेल पिकापासुन एका वर्षामध्ये हेक्टरी ३५०-४०० क्विटल व
बागायतीमध्ये ६००-८०० क्विटल प्रति हेक्टर इतके चारा उत्पादन मिळते.

द्विदल चारा पिके

चवळी :

चवळी पिकाच्या चा-यापासुन जनावरांना मोठ्या प्रमाणात नत्र व स्फुरद उपलब्ध होते. जमिनीला नत्र मिळते व जमिनीचा पोत सुधारतो. हवामान उष्ण व कोरडे मानवते, मध्यम ते भारी व योग्य निचरा होणारी जमीन अवश्यक आहे. योग्य प्रमाणात खतांचा वापर केल्यास हलक्या जमिनीतही चांगले उत्पादन घेता येते.
पेरणी : पाभरीच्या सहाय्याने दोन ओळीत ३० सें.मी. अंतर ठेऊन पेरणी करावी. पेरणीपुर्वी १० किलो विवाण्यास २५० ग्रॅम रायझोबिअम जिवाणू संवर्धन खत चोळावे.
पेरणीची वेळ : खरीप : जुन ते ऑगष्ट, उन्हाळी फेब्रुवारी ते एप्रिल बियाणे:- चा-यासाठी चवळी पिकाचे हेक्टरी ४० किलो बियाणे लागते. सुधारित वाण:- श्वेता, इ. सी. ४२१६, बुंदेल लोबीया, यु.पी. सी. ५२८६. कापणी:- पेरणीनंतर ६०-६५ दिवसांनी कापणी करावी.
उत्पादन:- उत्तम व्यवस्थापनामध्ये चवळी पिकापासुन हेक्टरी ३००-३५० क्विटल चारा मिळतो. प्रथिने या चारा पिकामध्ये १३ ते १५ टक्के प्रथिने असतात.

स्टायलो-

स्टायलो हे द्विदल वर्गीय चारा पिक आहे. हे कमी उंचीचे, लागण करण्यास सोपे व जमिनिचा पोत सुधारण्यास मदत करणारे आहे. विशेष बाब म्हणजे या पिकापासून जनावरांना १२-१४ टक्के प्रथिने मिळतात. जमीन हलकी ते मध्यम, योग्य निचरा होणारी जमीन असावी.
पूर्वमशागत :- एखादी कुळवणी करून पेरणी करावी.

लृसर्णघास-

हे द्विदल वर्गीय चारा पिक आहे. हे दिसावला मेथीच्या भाजीसारखे असते. या पिकापासुन मिळणारा चारा लुसलुसीत आसतो व त्यापासुन मिळणा-या प्रथिने (१९ ते २२ टक्के) व इतर अन्न घटकामुळे तो दुभत्या जनावरांना चागला मानवतो. तसेच हे पिक जमिनी आरोग्यासाठीही चांगले आहे. जमीनीत नत्राचे प्रमाण वाढून जमिन सुपीक होते. लसुणघास या पिकासाठी थंड व कोरडे हवामान पोषक आहे. या पिकासाठी मध्यम ते भारी योग्य निचरा होणारी जमीन आसावी. या पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी २५ किलो बियाणे लागते. बीज प्रक्रिया रायझोबियम जिवाणू संवर्धन खत २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे.

error: Content is protected !!