Crop Protection : मिरचीवरील रोगाचे नियंत्रण कसे करावे? रोपातील मर, फळ सडणे, पानांवरील ठिपका यावर रामबाण उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Crop Protection : मिरची पिकामध्ये मुख्यत्वे मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणूजन्य पानावरील ठिपके, कोईनोफोरा करपा, भुरी रोग, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यावरील योग्य उपाययोजना केल्यास प्रभावी नियंत्रण होऊ शकते.

1) रोपातील मर –

हा रोग जमिनीत वाढणाऱ्या पिथियम डिबँरीयम या बुरशीमुळे मर रोग होतो. मिरचीच्या रोपवाटिकेमध्ये बीज लागवडीनंतर दुसऱ्या आठवड्यापासून ते पाचव्या आठवड्यापर्यंत या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. नुकसानग्रस्त रोपाचा जमिनीलगतचा भाग मऊ पडून रोपे कोलमड्तात व मरतात.

रोग नियंत्रणाचे उपाय-

1) रोपवाटिका उंच गादीवाफ्यावर केल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होऊन बुरशीची वाढ रोखण्यास मदत होईल.
2) एकरी लागवडीकरिता 650 ग्रॅम बियाणे वापरावे. दाट लागवड केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो.
3) मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
4) ड) कॉपर ऑक्‍झीक्‍लोराइड 30 ग्रॅम प्रति 10 लिटर प्रमाणे बियाणे लागवडीपासून दुसऱ्या आठवड्यात व तीसऱ्या आठवड्यात दिवशी वाफ्यावर ड्रेंचिंग करावी.

2) डायबॅक आणि फळ सडणे –

हा रोग कोरडवाहू तसेच ओलिताखालील अशा दोन्ही मिरची पिकांमध्ये आढळून येतो. या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होतो. मिरची पिकात ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये पीक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगामुळे पिकाची फांदी शेंड्याकडून खालच्या दिशेने वाळत येते. नुकसानग्रस्त फांदीची साल प्रथम करड्या रंगाची होऊन फांदीवर घट्ट काळ्या रंगाची ठिपके आढळतात. नुकसानग्रस्त फांदीला फळेसुद्धा लागलेली असतात. पक्व झालेल्या फळावर गोलाकार किंवा अंडाकृती काळे ठिपके आढळतात. नुकसानग्रस्त फळे सुकतात आणि वाळतात.

रोग नियंत्रणाचे उपाय –

1) हा रोग बियाण्यापासून होत असल्यामुळे रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा.
2) मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
3) या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रोगग्रस्त फांद्या गोळा करून जाळून टाकाव्यात.
4) बुरशीजन्य रोग आढळून आल्यानंतर 25 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 30 ग्रॅम कॉपर ऑक्‍झिक्‍लोराईड 10 लिटर पाण्यात घेऊन गरजेनुसार नियंत्रित फवारण्या घ्याव्यात.

3) पानांवरील ठिपका –

हा रोग सरकोस्पोरा या बुरशीमुळे होतो. साधारणतः ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी या महिन्यांत रोगाचा प्रादुर्भाव पानावर करड्या रंगाच्या लहान ठिपक्‍यांच्या स्वरूपात आढळून येतो. काही कालावधीनंतर या ठिपक्‍यांचा रंग बदलून पांढुरका रंग पानाच्या मध्यभागी आढळतो. तसेच पानाच्या कडेला गर्द करडा रंग असतो. या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास पाने भरपूर प्रमाणात पिवळी पडून गळून जातात.
रोग नियंत्रणाचे उपाय –
10 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 25 ग्रॅम मॅन्कोझेब हे बुरशीनाशक प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

error: Content is protected !!