Crop Subsidy : मका, ऊस पिकासाठी अनुदान मिळणार; ‘या’ राज्य सरकारची नवीन योजना!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये (Crop Subsidy) मका आणि उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मका आणि उसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इथेनॉल निर्मिती उद्योगाचा विस्तार होऊ लागल्याने, मका, ऊस पिकाचे महत्व वाढले आहे. परिणामी, आता मका आणि ऊस पिकाखालील लागवड क्षेत्रात वाढ व्हावी. शेतकऱ्यांनी अधिकाधिक या पिकांकडे वळावे. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान (Crop Subsidy) दिले जाणार आहे.

दोन हेक्टरपर्यंत मिळणार अनुदान (Crop Subsidy For UP Farmers)

देशातील आघाडीचे ऊस आणि मका उत्पादक राज्य असलेल्या उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने याबाबत नवीन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना सरकारकडून मका व ऊस पिकाच्या लागवडीसाठी प्रति शेतकरी दोन हेक्टरपर्यंत अनुदान (Crop Subsidy) दिले जाणार आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून उत्तरप्रदेशातील ऊस पिकाखालील क्षेत्र दोन लाख हेक्टरपर्यंत वाढवण्यास मदत होणार आहे. तर राज्यातील मका उत्पादन 11 लाख मेट्रिक टनांहून अधिक वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचेही उत्तरप्रदेश सरकारने म्हटले आहे.

किती मिळणार अनुदान?

युपी सरकारकडून शेतकऱ्यांना मकाच्या जातीनिहाय शेती करण्यास अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने देशी मका, संकरित मका आणि पॉप कॉर्नसाठीच्या मकासाठी प्रति हेक्टर 2400 रुपये अनुदान दिले जाणार आहे. तर बेबी कॉर्न आणि अन्य मकाच्या शेतीसाठी 16,000 रुपये प्रति हेक्टर, आणि गोड प्रकारातील मकासाठी 20,000 रुपये अनुदान उत्तरप्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.

पुढील चार वर्ष ही योजना चालवली जाणार आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी बियाणे, जमीन मशागत आणि सुरवातीच्या भांडवलासाठी प्रति हेक्टर 900 रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे आता उत्तरप्रदेशातील मका आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!