Cucumber Farming : काकडीच्या ‘स्वर्ण शीतल’ वाणाद्वारे मिळेल भरघोस उत्पन्न; वाचा वैशिष्ट्ये?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात काकडीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काकडी (Cucumber Farming) हे वेलवर्गीय पीक असून, तिचा उपयोग सॅलड म्हणून मोठ्या प्रमाणात होतो. बऱ्याच ठिकाणी काकडीची भाजी केली जाते. इतकेच नाही तर अनेक लोक कच्च्या स्वरूपात काकडी खातात. ज्यामुळे काकडीला बाजारात मोठी मागणी असते. ज्यामुळे काकडी पिकातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवता येते. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतकरी ऑनलाईन पद्धतीने ‘स्वर्ण शीतल’ काकडीचे बियाणे (Cucumber Farming) कसे मागवू शकतात. हे वाण शेतकऱ्यांसाठी कसे उपयोगी आहे. याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…

कुठे मिळणार बियाणे? (Cucumber Farming Swarna Shital Variety)

राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या (एनएससी) माध्यमातून शेतकरी ऑनलाईन पद्धतीने काकडीचे ‘स्वर्ण शीतल’ या जातीचे बियाणे (Cucumber Farming) मागवू शकतात. हे बियाणे तुम्ही ओएनडीसी अर्थात ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सद्वारे राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून मागवू शकतात. या ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक पिकांचे बियाणे खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्या ठिकाणाहून शेतकरी घरबसल्या हव्या त्या प्रजातीचे बियाणे मागवू शकतात.

काय आहेत या जातीची वैशिष्ट्ये?

स्वर्ण शीतल प्रजातीच्या काकडीचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो. एखाद्या शेतकऱ्याने एक हेक्टर जमिनीमध्ये काकडीची लागवड (Cucumber Farming) केल्यास, हेक्टरी 290 ते 300 क्विंटल उत्पादन मिळते. या स्वर्ण शीतल प्रजातीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे वाण रोगांना सहजासहजी बळी पडत नाही. काकडीची ही जात केवळ ६० ते ७० दिवसांत काढणीला येते. या प्रजातीच्या काकडीची लागवड उन्हाळ्यात मार्च महिन्यात केली जाते. तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये देखील जून-जुलै या वाणाची लागवड केली जाते. तर डोंगराळ भागात मार्च आणि एप्रिल महिन्यात या वाणाची लागवड केली जाते.

किती आहे किंमत?

तुम्हालाही काकडीची लागवड करायची असेल तर तुम्ही स्वर्ण शीतल प्रजातीची लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकतात. या वाणाच्या काकडीचे बियाणे 50 ग्रॅमचे पॅकेट, सध्या केवळ 60 रुपयांमध्ये 31 टक्के सवलतीसह ऑनलाइन उपलब्ध आहे. तुम्ही हे बियाणे घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. काकडीचे फळ प्रामुख्याने कच्च्या अवस्थेत तोडले पाहिजे. जेणेकरून त्यांना बाजारात चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांनी दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी काकडीची तोडणी केली पाहिजे. काकडीची तोडणी ओरबाडून न करता, धारदार चाकूने काकडीची तोडणी करावी. वेलीला कोणत्याही प्रकारची इजा होणार अशा पद्धतीने काकडीची तोडणी करावी.

error: Content is protected !!