Cultivation of Black Grapes : काळ्या द्राक्षाची लागवड केली तर मिळेल चांगला नफा; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारत हा कृषिप्रधान देश असून या देशामध्ये अनेक वेगेवेगळी पिके घेतली जातात. शेतकरी (Farmer) आपले उत्पन्न वाढावे या दृष्टीने अनेक वागेवगळी पिके घेत असतात. ज्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील होतो. आज देखील आपण अशाच एका पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत ज्याच्या लागवडीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा तर होईलच पण ते खाल्ल्याने तुमचे शरीर देखील चांगले मजबूत बनेल. आज आपण काळ्या द्राक्षाच्या लागवडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

काळा मनुका हा काळ्या द्राक्षापासून तयार होतो म्हणून काळ्या द्राक्षाची लागवड कशी करावी याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. काळ्या द्राक्षांची लागवड भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, मिझोराम, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते. याच्या लागवडीसाठी खडे, वालुकामय आणि गुळगुळीत माती योग्य आहे. (Cultivation of Black Grapes )

एकदा लागवड केल्यानंतर वर्षानुवर्षे नफा मिळवा –

जर तुम्ही एकदा काळी द्राक्षे लावलीत तर त्यासाठी एक-दोन वर्षेच फळे मिळतील असे नाही. त्यांची योग्य निगा राखली तर तर एकदा लावलेल्या फळबागांतून किमान दहा वर्षे द्राक्षे येत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजेच त्याच्या लागवडीसाठी खर्च कमी आणि नफा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे याची लागवड करून तुम्ही चांगला नफा कमावू शकता.

Hello Krushi ‘या’ अँपबद्दल माहिती आहे का?

शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप आणले आहे. Hello Krushi असं या अँपच नाव आहे. या अँपमध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव, सरकारी योजना, हवामान अंदाज पशूंची खरेदी विक्री, त्याचबरोबर जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती तुम्ही अगदी मोफत मिळवू शकता. त्यामुळे लगेचच हे अँप डाउनलोड करा

error: Content is protected !!