हॅलो कृषी । सीताफळ म्हटले की गोड आणि रसदार फळ डोळ्यासमोर येते. अनेकांच्या आवडीच्या फळामध्ये या फळाचा समावेश आहे. गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. सोमवारी (दि. ३१ मे ) मार्केटयार्डातील फळ विभागात ६० किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार ६० ते १२१ रुपये भाव मिळाला व दरवर्षीप्रमाणे आवक कमी असल्यामुळे मागणी जास्तच राहणार असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडत असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सीताफळांचे व्यापारी युवराज काची यांनी प्रसार माध्यमांशी सोबत बोलताना दिली.
सोमवारी आवक झालेले सीताफळ हे वडकी येथील शेतकरी शशिकांत पाटे यांच्या शेतातून काची यांच्या मे. तुळजाराम पंथाराम बनवारी या फर्मवर ही आवक झाली. हा माल डेक्कन येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केला. जानेवारी अखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे. हळूहळू आवक आणि सीताफळांच्या भावात वाढ होणार आहे. करोना काळामध्ये अनेक समस्या शेतकऱ्यांना आल्या व त्यासोबतच मार्केट बंद असल्यामुळे आवक घटली होती.
या हंगामात आणि सीताफळाच्या सिझनमध्ये नागरिक आवर्जून सीताफळांची वाट पाहत असतात. वडकी, पुरंदर तालुका, यवत, उरळी कांचन, राजगुरूनगर, खेड भागातून जिल्ह्यातून आणि सातारा जिल्ह्यातून आवक होत असते. मागील वर्षी करोनाचा फटका सीताफळांना बसला होता. परिणामी विक्री न झाल्याने निच्चाअंकी भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्याची नाराजी होती.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा