Cyclone : चक्रीवादळासह जोरदार पाऊस; पश्चिम बंगालमध्ये 5 जणांचा मृत्यू, 300 हुन अधिक जखमी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून देशातील वातारवरणात सातत्याने बदल (Cyclone) पाहायला मिळत आहे. त्यातच गेले तीन ते चार दिवस राज्यासह देशातील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण कायम होते. रविवारी (ता.31) दुपारी पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागांमध्ये अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे 5 लोकांचा मृत्यू तर 300 हुन अधिक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या भागामध्ये केवळ 15 ते 20 मिनिट झालेल्या जोरदार पाऊस आणि चक्रीवादळामुळे (Cyclone) पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यासह अलीपुरद्वार, कूचबिहार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेजारील बिहार राज्यामध्येही या चक्रीवादळाची तीव्रता पाहायला मिळाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागाचा दौरा (Cyclone In West Bengal)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या चक्रीवादळग्रस्त (Cyclone) जलपाईगुडी जिल्ह्यासह नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला असून, त्यांनी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. अधिकृत माहितीनुसार, रविवारी दुपारी अचानक आलेल्या या चक्रिवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून, अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्याने सर्व अस्ताव्यस्त

विशेष म्हणजे अचानक आलेल्या या वादळाची तीव्रता इतकी जास्त होती की, अनेक भागांमध्ये घरे, मोटारसायकल आणि कार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाऱ्याने अस्ताव्यस्त झाल्याचे पाहायला मिळाले. वादळाचा (Cyclone) सर्वाधिक प्रभाव जलपाईगुडी, अलीपुरद्वार आणि कूचबिहार या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाला असून, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक मालमत्तांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. वादळाची तीव्रता ही पश्चिम बंगालच्या तीस्ता नदीच्या पात्रातून सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे. वादळाची तीव्रता पाहता, अग्निशमन दलासह प्रशासनातील विविध स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्या-त्या जिल्ह्यांमध्ये मदत कार्य सुरु केले. अग्निशमन दलाच्या माध्यमातून जखमींना मदत करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

error: Content is protected !!