Dairy Business : 40 म्हशींचा गोठा, रोज 250 लिटर दूध; शेतकऱ्याची मासिक साडेचार लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवयासाने (Dairy Business) शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. दुष्काळ, नापिकी, बाजारभाव न मिळणे आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसले तरी अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायातून आपली प्रगती साधत आहे. आज आपण जालना तालुक्यातील निधोना गावच्या एका शेतकऱ्याच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाबाबत (Dairy Business) जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपला तब्बल ४० पंढरपुरी म्हशींचा गोठा उभारला आहे. ज्यातून त्यांना मासिक साडेचार लाखांची कमाई होत आहे.

शेतीमध्ये आर्थिक नुकसान (Dairy Business)

तुकाराम शहापूरकर असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते जालना तालुक्यातील निधोना परिसरातील आंबेडकरनगर येथील रहिवासी आहेत. शेतकरी तुकाराम शहापूरकर यांनी केवळ शेतीच्या मागे न लागता, आपला दुग्ध व्यवसाय विस्तारला आहे. त्यांना आपल्या शेतीमध्ये नेहमीच आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर कधी बाजारभाव न मिळणे, यामुळे ते त्रस्त होते. ज्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी डेअरी व्यवसायाची कास धरत, आज मोठी प्रगती साधली आहे.

किती मिळते दिवसाला दूध?

शेतकरी तुकाराम शहापूरकर सांगतात, गोठ्यातील ४० म्हशींचे सकाळी १५० आणि सायंकाळी १०० लिटर दूध मिळते. विशेष म्हणजे ते आपले दूध कोणत्याही दूध संघाला न घालता, आपल्या दुचाकीद्वारे जालना शहरातील विविध हॉटेल आणि घरोघरी जाऊन थेट विक्री विकतात. त्यांना आपल्या म्हशीच्या दुधाला एक लिटरला ६० ते ७० रुपये याप्रमाणे दर मिळतो. अर्थात २५० लिटर दूध दररोज मिळत असल्याने, त्यांना २५० लिटर दुधाला ६० ते ७० रुपये दर याप्रमाणे एका दिवसाला १५ हजार रुपयांची कमाई होत असल्याचे ते सांगतात.

चारा, वैरणीवर 4000 रुपये खर्च

सध्याच्या घडीला दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी हळूहळू प्रगती करत, मोठी उंची गाठली आहे. आपल्या ४० म्हशींसाठी त्यांनी आधुनिक गोठा उभारला आहे. याशिवाय आपल्या ४० म्हशींसाठी ते दिवसभरात ओला चारा, पेंड, मुरघास यासाठी जवळपास चार हजार रुपये खर्च करतात. हा खर्च वगळता दिवसाला त्यांना म्हशींच्या दुध विक्रीतून १५ हजार रुपये नफा तर महिनाकाठी साडेचार लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!