सुरु करा महिन्याला 70 हजार कमाई देणारा डेअरी व्यवसाय! सरकारही करेल मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । करोनाच्या दुसऱ्या लाटेमधे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे, कमी बजेटमध्ये कोणता व्यवसाय करावा याबाबत अनेक तरुण गोंधळात आहेत. तुम्हीही असाच विचारात असाल तर आम्ही तुम्हाला एक व्यवसाय सुचवणार आहोत. एक असा व्यवसाय आहे, ज्यात मोठ्या मागणीसह नुकसानीची शक्यताही कमी आहे. डेअरी प्रोडक्ट्सचा व्यवसाय करता येऊ शकतो, ज्यात चांगला नफाही कमावता येतो. हा नेहमी बाराही महिने मागणी असलेला व्यवसाय आहे. डेअरी व्यवसायात तुमच्याकडील 5 लाख रुपये गुंतवणूक करून दर महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. यामुळे नवीन उद्द्योजकांनी याचा विचार करायला हरकत नाही.

नवीन व्यवसायासाठी तुमच्याकडे पैसे कमी असतील तर, भारत सरकारही यात मदत करतं. छोट्या व्यवसायासाठी सरकार पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत लोन देतं. केवळ कर्जचं नाही, तर सरकार पैशांसह या प्रोजेक्टबाबतही संपूर्ण माहिती देतं. डेअरी प्रोडक्टसाठी एकूण कॉस्ट 16.5 लाख रुपये आहे. परंतु सरकार या फंडच्या 70 टक्के लोन देतं. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक व्यक्तीला स्वत:कडून 5 लाख रुपये टाकावे लागतील. बॅक 7.5 लाख रुपये टर्म लोन आणि 4 लाख रुपये वर्किंग कॅपिटल रुपात देईल. पंतप्रधान मुद्रा योजनेच्या प्रोजेक्टनुसार, डेअरी व्यवसायात वर्षाला 75 हजार फ्लेवर्ड मिल्कचा व्यवसाय होऊ शकतो. त्याशिवाय 36 हजार लीटर दही, 90 हजार लीटर बटर आणि 4500 किलोग्रॅम तूप असा व्यवसाय होऊ शकतो. म्हणजेच जवळपास 82 लाख 50 हजार रुपयांचा टर्नओवर होऊ शकतो. ज्यात 74 लाख रुपये कॉस्टिंग होईल, तर 14 टक्के व्याजानंतर जवळपास 8 लाखांची बचत होऊ शकते. यामुळे हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो.

सर्व व्यवस्था झाल्यानंतर प्रश्न येतो तो जागेचा! डेअरी बिजनेस सुरू करण्यासाठी 1000 स्क्वेअर फूट जागेची गरज लागेल. ज्यात 500 स्क्वेअर फूट प्रोसेसिंग एरिया, 150 स्क्वेअर फूटमध्ये रफ्रिजरेटर रुम, 150 स्क्वेअर फूटमध्ये वॉशिंग एरिया, 100 स्क्वेअर फूट जागा ऑफिस आणि इतर सुविधांची लागू शकते. यासोबत कच्च्या मालमध्ये महिन्याला 12,500 लीटर दूध खरेदी, 1000 किलोग्रॅम साखर, 200 किलोग्रॅम फ्लेवर्स, 625 किलो मसाले खरेदी करावे लागू शकतात. यासाठी 4 लाख रुपये लागतील. यातून, 82.5 लाख टर्नओवर मध्ये वार्षिक गुंतवणूक 74.40 लाख रुपये आहे, ज्यात 14 टक्के व्याज सामिल आहे. म्हणजेच 8.10 लाख रुपये वार्षिक नफा होऊ शकतो. यामुळे शेतीला एक जोडधंदा म्हणून किंवा स्वतंत्रपणेही हा व्यवसाय करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!