Dairy Business : एक शेतकरी संपूर्ण गावाला पुरवतोय बायोगॅस; उभारलाय 140 गायींचा गोठा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात डेअरी व्यवसाय (Dairy Business) करण्याकडे वळत आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक कमाई होत आहे. ग्रामीण भागात अनेक जणांना गॅससाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागते. किंवा मग मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड आणि गोवऱ्या यांची तरतूद करावी लागते. मात्र आता याच डेअरी व्यवसायाच्या जोरावर एक गाव असे आहे. ज्या ठिकाणी सर्व घरातील ‘चूल’ ही मोफत पेटत असल्याचे समोर आले आहे. आज डेअरी व्यवसायामुळे (Dairy Business) या संपूर्ण गावाची भरभराट झाली आहे.

100 रुपयात महिनाभर गॅस (Dairy Business Farmer Supplying Biogas Village)

पंजाबमधील बहादुरपुर असे या गावाचे नाव असून, या गावातील प्रत्येक घरात बायोगॅस (Dairy Business) वापरला जातो. विशेष म्हणजे केवळ 100 रुपये प्रति महिना इतक्या माफक शुल्कात सर्व नागरिकांना हा गॅस मिळतो. 100 रूपये हे शुल्क बायोगॅस प्लांटच्या देखभाल दुरुस्तीसाठी वापरले जाते. ज्या बदल्यात गावातील प्रत्येक घरातील चूल पेटते. बहादुरपुर येथील कुलदीप कौर या शेतकऱ्याने 140 गायींच्या शेणातून डेअरीच्या माध्यमातून एक बायोगॅस प्लांट उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे कुलदीप डेअरी गावातील कोणत्याही नागरिकाकडून एक रुपया देखील घेत नाही.

5 गायींपासून सुरुवात

‘कुलदीप कौर डेअरी’चे संस्थापक कुलदीप कौर यांचा मुलगा गगनदीप कौर यांनी म्हटले आहे की, जवळपास 10 वर्षांपूर्वी वडिलांसोबत पशुपालन व्यवसायाकडे (Dairy Business) वळण्याचा निर्णय घेतला. घरातील उपलब्ध भांडवलाच्या जोरावर 5 गायी घेतल्या. जेव्हा पशुपालन व्यवसायात प्रगती होऊ लागली. तेव्हा गायींची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. सुरवातीला आमच्याकडे केवळ एकाच प्रजातीची गाय होती. मात्र, सध्या आपल्या कुलदीप कौर डेअरीकडे एचएफ, जर्सी आणि साहीवाल अशा सर्व प्रकारच्या जातीच्या 140 गायी आहेत.

शेणातून अडीच हजारांची कमाई

गगनदीप यांनी म्हटले आहे की, बायोगॅस प्लांटमध्ये गॅसनिर्मितीनंतर आपण उरलेले शेण शेतकऱ्यांना खत म्हणून विक्री करतो. आपल्या प्लांटमधून दररोज पाच ट्रॉली शेणखत मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक ट्रॉली 500 रुपयांमध्ये विकली जाते. याप्रमाणे दररोज अडीच हजारांची कमाई सहज होते. सध्या गगनदीप यांच्या डेअरी फार्ममध्ये 140 गायी आहेत. सर्व गायींचे मिळून एकूण 950 ते एक हजार लीटर दूध मिळते. हे सर्व दूध आपण ‘वेरका दूध संघाला विक्री करत असल्याचे गगनदीप यांनी म्हटले आहे.

व्यवसायाचे प्रशिक्षण घ्यावे

शेतकरी कुलदीप कौर यांचे म्हटले आहे की, शेतकऱ्यांना डेअरी व्यवसायात यायचे असेल तर त्यांनी त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग घेणे खूप महत्वाचे आहे. गाय किंवा म्हशींची चांगल्या प्रजाती पाळल्या पाहिजेत. याशिवाय शेतकऱ्यांनी व्यवसायातील उत्पादन खर्च कसा कमी करता येईल? यावर काम करणे आवश्यक असते. जसे की शेतकरी आपल्या दुग्ध व्यवसायासाठी घरच्या शेतात विविध प्रकारचा चारा पिकवू शकतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना दूध उत्पादनात वाढ करण्यासह गुणवत्तापूर्ण चारा निर्मिती करता येईल.

error: Content is protected !!