Dairy Business : दुग्ध व्यवसाय सुरु करायचाय; पहा…कसे मिळवाल अनुदान व कर्ज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय (Dairy Business) मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय दोन गायी किंवा दोन म्हशींच्या माध्यमातून शेतकरी सुरु करू शकतात. ज्यामुळे त्यांना चांगला नफा मिळवता येतो. तुम्हालाही डेअरी व्यवसाय सुरु करायचा असेल. मात्र त्यासाठी गाय किंवा म्हैस खरेदीसाठी भांडवल उपलब्ध नसेल. तर आज आम्ही तुम्हाला केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून दूध व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज कसे मिळवायचे याबाबतची माहिती सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला डेअरी व्यवसाय (Dairy Business) सुरु करण्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो.

दुग्ध व्यवसाय विकास योजना (Dairy Business How To Get Subsidy, Loan)

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी डेअरी व्यवसाय (Dairy Business) सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. दुग्ध व्यवसाय विकास योजनेद्वारे हे कर्ज सरकारकडून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. तुम्हीही गाय किंवा म्हशींची खरेदी करून, स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल. तर त्यासाठी अनुदान आणि कर्जासाठी तुम्ही बँकेकडे संपर्क साधू शकता. मागणी अर्ज केल्यानंतर तुम्हाला नाबार्डकडून दूध व्यवसाय सुरु करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाईल. याशिवाय नाबार्डकडून पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

किती मिळेल अनुदान?

या योजनेच्या माध्यमातून दूध व्यवसाय (Dairy Business) सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना नाबार्डकडून एकूण प्रकल्प खर्चाच्या 33.33 टक्के अनुदान दिले जाते. याशिवाय शेतकऱ्यांना 10 म्हशींच्या माध्यमातून दूध व्यवसाय सुरु करण्यासाठी सात लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये ओपन कॅटेगरीमधील शेतकऱ्यांना 25 टक्के अनुदान मिळते. तर महिला शेतकरी व अन्य जातीच्या शेतकऱ्यांना 33 टक्के अनुदान दिले जाते. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना दूध काढण्याची मशीन, दूध ठेवण्यासाठी कुलिंग मशीन खरेदी करण्यासाठी नाबार्डकडून 20 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

10 टक्के भांडवल आवश्यक

दुग्ध व्यवसाय विकास योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या 10 टक्के भांडवल हे शेतकऱ्यांना उभे करावे लागणार आहे. याशिवाय या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना ९ महिन्यांच्या आत डेअरी व्यवसाय सुरु करणे बंधनकारक असणार आहे. दूध व्यवसाय सुरु केल्यानंतरच अनुदानाची रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. हे अनुदान शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून दूध व्यवसायासाठी कर्ज घेतले असेल त्या बँकेत जमा होते. हे कर्ज आणि अनुदान शेतकऱ्यांना प्रामुख्याने गोठा उभारणी, दूध काढण्याचे मशीन, गाय आणि म्हैस यांच्या खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जाते.

कर्ज मिळवण्यासाठीच्या अटी?

  • या योजनेमार्फत एखादा शेतकरी वेगवेगळ्या अर्थात पोल्ट्री आणि दूध व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यास पात्र असतो. मात्र एकावेळी एकाच व्यवसायासाठी कर्ज मिळते.
  • एका कुटुंबातील एकाहून अधिक शेतकऱ्यांना कर्ज मिळते. मात्र त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करावे लागते. एकत्र व्यवसाय करता येत नाही.
  • अर्थात कुटुंबातील दोन व्यवसायामध्ये कमीत कमी 500 मीटर अंतर असणे आवश्यक असते.

कसा कराल अर्ज?

दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डेअरी फार्मची नोंदणी करणे आवश्यक असते. त्यानंतर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन दूध व्यवसाय सुरु करण्यासाठीचा अनुदान अर्ज करू शकता. कर्जाची रक्कम अधिक असल्यास तुम्हाला तुमचा दूध व्यवसायाचा (Dairy Business) प्रकल्प अहवाल बँकेला सादर करावा लागेल. या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला बँक पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

कुठे कराल अर्ज?

दुग्ध व्यवसाय विकास योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. त्या ठिकाणी तुम्ही या योजनेबाबत सर्व माहिती बँक अधिकाऱ्यांकडून समजून घ्या. किंवा मग तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही नाबार्ड बँकेच्या जवळच्या कार्यालयालाही भेट देऊ शकता. किंवा मग नाबार्डच्या https://nabard.org या संकेतस्थळावर या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. आणि जवळच्या बँकेत आपला दुग्ध व्यवसायासाठीचा अर्ज करू शकतात.

error: Content is protected !!