Dairy Business : डेअरी व्यवसायातून महिलेने साधली प्रगती; वर्षाला करतीये 15 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय पुरुषसत्ताक संस्कृतीमध्ये (Dairy Business) एक काळ होता. जेव्हा महिलांकडे केवळ ‘चूल आणि मूल’ अशी जबाबदारी होती. मात्र आज महिला सर्वच क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण करत आहे. शेतीसह दुग्धव्यवसायामध्ये देखील महिला आज मागे राहिलेल्या नाही. अलीकडेच महाराष्ट्रात देखील अनेक महिला शेतकऱ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शेतीमध्ये मोठी प्रगती साधल्याच्या यशोगाथा समोर आल्या आहे. राज्यात महिला शेतकरी भाड्याने शेती घेत, आधुनिक पद्धतीने पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला व फुलशेती करत अधिकाधिक उत्पन्न मिळवत आहे. आज आपण महिला शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या डेअरी व्यवसायातून (Dairy Business) वार्षिक 15 लाखांची कमाई करत आहे.

शेतीला डेअरी व्यवसायाची जोड (Dairy Business Progress Made By Women Farmer)

सविता देवी असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या बिहारच्या बांका जिल्ह्यातील सिझुआ गावच्या रहिवासी आहे. शेतकरी सविता देवी यांच्याकडे केवळ एक हेक्टर जमीन आहे. सविता यांच्या कुटुंबाचा थोड्या जमिनीत उदरनिर्वाह चालत नव्हता. ज्यामुळे त्यांनी एक होल्सटीन फ्रीजियन प्रकारच्या गाईची खरेदी करत दुग्ध व्यवसाय (Dairy Business) करण्यास सुरुवात केली. आज त्यांनी आपल्या दुग्धपालन व्यवसायाचा आवाका वाढवला असून, सध्या त्या 15 गायींच्या माध्यमातून दूध व्यवसाय करत आहे. शेतीसह दूध व्यवसायामुळे सविता देवी यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत झाली आहे.

चारा व्यवस्थापनावर भर

सुरुवातीला सविता देवी यांना दूध व्यवसायातील बारकावे माहिती नसल्याने, त्यांनी डेअरी व्यवसायातील बारकावे स्थानिक डेअरी व्यवसायातील जाणकारांचा सल्ला घेतला. यासाठी त्यांनी दुग्ध व्यवसाय करताना आधुनिक चारा पद्धती यांची माहिती घेतली. यामध्ये त्यांनी युरिया मिश्रित चारा निर्मिती, नेपिअर चारा निर्मिती, बरसीमचे उत्पादन, गायींचे दूध वाढवण्यासाठी चवळीची शेती, याशिवाय आपल्या माळरान जमिनीवर त्यांनी घासाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. शेतीमध्ये तयार झालेल्या सुक्या चाऱ्याला देखील त्या तितकेच महत्व देतात. यासारखे चारानिर्मितीचे काही उपाय करणे सुरु केले. ज्यातून त्यांना दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ मिळवण्यात यश मिळाले आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

सध्याच्या घडीला सरिता देवी यांच्याकडे 15 गायी असून, आपल्या दूध व्यवयासातून दररोज जवळपास 150 लीटर दूध त्यांना मिळत आहे. याशिवाय गायीच्या शेणापासून त्या कंपोस्ट खतनिर्मिती करत असून, त्यातून त्यांना मोठी कमाई होत आहे. एकत्रितपणे त्या आपल्या दूध व्यवसायातून 15 लाखांची कमाई करत आहे. विशेष म्हणजे त्या शेतातील हिवरळीच्या चाऱ्यासह हाइड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चारा उत्पादित करत आहे. ज्यामुळे आपल्या दूध उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!