Dairy Business : 5 गायींपासून सुरुवात, आज 46 गायींचा गोठा; महिन्याला 7 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात एकवेळ अशी होती की ‘महिला शेतकरी’ म्हणजे शेती व्यवसायाचा (Dairy Business) दूर्लक्षित कणा असे म्हटले जायचे, मात्र आज शेतीमध्ये सर्वच पातळ्यांवर महिला स्वतःला सिद्ध करत आहेत. डेअरी व्यवसायामध्ये देखील त्या मागी राहिलेल्या नाहीत. दुग्ध व्यवसायामध्ये महाराष्ट्रात ठसा उमटवणाऱ्या श्रद्धा ढवण या 21 वर्षीय तरुणीची यशोगाथा सर्वश्रुत आहे. अशातच आता कर्नाटकातील 39 वर्षीय राजेश्वरी या महिलेने पाच गायींपासून सुरु केलेला दुग्ध व्यवसाय आज 46 गायींपर्यंत वाढवला असल्याचे समोर आले आहे. आपण राजेश्वरी यांच्या दुग्ध व्यवसायातील (Dairy Business) यशाबद्दल जाणून घेणार आहोत.

सर्वक्षेष्ठ महिला दूध उत्पादक (Dairy Business Earnings 7 Lakhs Per Month)

राजेश्वरी यांचा गेल्या पाच वर्षातील दुग्ध व्यवसायातील (Dairy Business) प्रवास हा नक्कीच सोपा नव्हता. त्या आजच्या घडीला आपल्या ४६ गायींपासून दररोज 650 लिटर दूध उत्पादित करत आहे. विशेष म्हणजे राजेश्वरी यांचे यश पाहून त्यांच्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. राजेश्वरी या कर्नाटकातील तुमकुरु या दुष्काळी जिल्ह्यातील रहिवासी आहे. राजेश्वरी यांनी 2019 मध्ये 5 गायी खरेदी करत आपला दूध व्यवसाय सुरु केला होता. मात्र पाचच वर्षांमध्ये त्यांनी आपल्या दुग्ध व्यवसायाचे रुपडे पालटून टाकले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मागील आठवड्यात इंडियन डेअरी असोशिएशनकडून सर्वक्षेष्ठ महिला दूध उत्पादक हा पुरस्कार देण्यात आला आहे.

चाऱ्यासाठी भाड्याने जमीन

राजेश्वरी यांनी 39 व्या वर्षी 2019 पासून आपला दुग्ध व्यवसाय सुरु केला. तेव्हा त्यांच्यासमोर अनेक संकटे होती. दुष्काळी भाग असल्याने त्यांना चाऱ्यापासून ते पशु वैद्यकीय डॉक्टरांपर्यंत सर्व व्यवस्था करावी लागली. अशी परिस्थिती असतानाही त्यांनी डेअरी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मका आणि चाऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी काही शेतकऱ्यांकडून भाडेतत्वावर जमिन घेतली आहे. ज्यामुळे त्यांच्या दुधाळ जनावरांना हिरवा चारा मिळण्यास मदत झाली आहे.

किती मिळते उत्पन्न?

राजेश्वरी सांगतात, “भाडेतत्वावर शेती उपलब्ध झाल्याने जनावरांना गुणवत्तापूर्ण चारा मिळून, व्यवसायातील नफ्यात वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे. ज्यामुळे हळूहळू गायींची संख्या वाढवण्यात येत असून, आपल्याकडे सध्या जर्सी आणि होल्स्टीन फ़्रीज़ियन प्रजातीच्या 46 गायी आहेत. आपल्या या गायींपासून दररोज 650 लिटर दूध कर्नाटक मिल्क फेडरेशनला पाठवले जात आहे. त्यातून महिन्याकाठी 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.”

अनेक पुरस्कारांनी सन्मान

राजेश्वरी यांनी आपल्या व्यवसायाच्या देखभालीसाठी आणि गायींना चारा पाणी करण्यासाठी चार कामगारांना ठेवले आहे. परिणामी, त्यांना उन्हाळाच्या दिवसांमध्ये कामगारांच्या पगारासोबतच आसपासच्या जिल्ह्यांतून चारा उपलब्ध करण्यासाठी देखील मोठा खर्च करावा लागतो. तर पावसाळयाच्या दिवसांमध्ये भाड्याच्या जमिनीवर हिरवा चारा उत्पादित होतो. राजेश्वरी यांना आपल्या दुग्ध व्यवसायाच्या यशासाठी आतापर्यंत दोन कन्नड़ राज्योत्सव तालुका स्तरीय पुरस्कार, सहा कर्नाटक मिल्क फेडरेशनचे तालुका स्तरीय पुरस्कार आणि सर्वक्षेष्ठ महिला दूध उत्पादक पुरस्कार मिळाला आहे.

error: Content is protected !!